कर्जत विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंड करण्याच्या मानसिकतेत आहेत अशी खात्रीलायक माहिती असून भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात जाऊन घेतले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कर्जत विधानसभा क्षेत्रात्र भारतीय जनता पक्षाचे शिवसेना शिंदे गट व विद्यमान आमदार यांच्यासोबत सख्य नाही. मागील निवडणुकीत विद्यमान आमदार महोदय यांच्यासाठी दिवस रात्र खस्ता खाऊन देखील कर्जत मध्ये भाजपच्या ज्या सेनेसोबत वाटाघाटी झाल्या होत्या त्याच्या कमीट्मेंट आमदारांनी पाळल्या नाहीत यावरून भाजप मध्ये कमालीची नाराजी होती. तसेच जी विकासकामे आली त्यातही भाजपला डावलण्यात आले. अनेक भाजप कार्यकर्त्यांचे प्रवेश युतीत असताना करून घेण्यात आल्याने भाजप कार्यकर्ते स्थानिक आमदार यांच्यावर संतप्त झाले होते व येत्या निवडणूकीत हे कार्यकर्ते महायुतीचे काम करण्याच्या मनस्थितीत नसताना महायुती मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बंड केले आहे त्या बंडास त्यांच्या नेत्यांचा उघड पाठींबा दिसत नसला तरी बाह्य शक्ती कार्यरत आहे. हे बंड थोपवण्यात स्थानिक आमदार अपयशी ठरल्याचे दिसून येते. आता भाजप कार्यकर्ते देखील आपली शक्ती पणाला लावणार असल्याचे दिसते. सुरेशभाऊ लाड यांच्या प्रवेशानंतर भाजप या विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे असे भाप कार्यकर्त्यांचे मत आहे. भाजपच्या जीवावर आमदार दुसरा निवडून द्यायचा आणि आपण चिंचोक्या खायच्या हा कुठला व्यवहार आहे? असा सवाल भाजप कार्यकर्ते बैठकीत करतात. म्हणून दिनांक २८ ऑक्टोबर रोजी भाजप नेते किरण ठाकरे हे ज्येष्ठ नेत्याच्या उपस्थिती मध्ये उमेदवारी अर्ज भरणार असून अनेक वर्षांचे भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी किरण ठाकरे सज्ज झालेले आहेत. त्यामुळे कर्जत विधानसभेत आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
