कर्जत मतदार संघात सध्या तरी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी एकसंघ असून युतीतच 3 उमेदवार आहेत. अशा वेळी विद्यमान आमदार यांच्या समोर भाजपचा उमेदवार उभा राहिल्याने मोठी मुश्किल निर्माण झाली आहे

कर्जत मतदार संघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण त्या आधी जेव्हा 80 च्या दशकात तत्कालीन भाजपा ने वि. प्र. गांगल यांच्या माध्यमातुन निवडणुक लढवली तेव्हा भाजपचे प्राबल्य या मतदारसंघात होते. त्या नंतर भाजपने युती धर्म म्हणून विशेष ताकद नसताना ही जागा शिवसेनेला दिली व देवेंद्र साटम निवडून आले व भाजप कार्यकर्ते या मतदारसंघात नेहमी अल्प मोबदल्यात युतीचे काम करू लागले. एकाच हॉटेल वर बसनाऱ्या व चहा पिणाऱ्या नेहमीच्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष व्यापला.
सन 2014 मध्ये भाजपने ऍड राजेंद्र येरुणकर यांच्या माध्यमातून परत स्वतंत्र निवडणुक लढवली. त्यावेळी भाजपला 14 हजार मतांवर समाधान मानावे लागले होते.
2014 ला राज्यात भाजपा सत्तेत आली आणि विस्तारवादी व व्यापक भूमिकेत कर्जतला नवीन कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्यात आले. त्या माध्यमातून नवीन तरुणांना संधी देण्यात आली. रायगड जिल्ह्याचे विभाजन करून रायगड उत्तर व रायगड दक्षिण असे दोन जिल्हे पक्ष संघटना स्तरावर निर्माण झाले.

श्री रवींद्र चव्हाण रायगड चे पालकमंत्री झाले व त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात युतीचे 6 आमदार निवडून आले. पनवेल ला प्रशांत ठाकूर यांचे प्राबल्य होते पण उरण व पेण या मतदारसंघात भाजप ने कसब दाखवून सीट आणल्या. यात अपक्ष आमदार बालदी हे निवडून आले व जिल्ह्यात भाजपा चा बालदी पॅटर्न रूढ झाला. या घटनेला श्री चव्हाण यांचे सहकार्य असले तरी ठाकूर घराण्याचे प्राबल्य महत्वाचे मानले जाते.
श्री चव्हाण यांची ही कार्यपद्धती या वेळी कुठेही दिसून आलेली नाही. कर्जत मध्ये भाजपने बंडखोरी केल्यावर हा मुद्दा चर्चेला आला आहे.
बालदी पॅटर्न चे असे शब्दश: वर्णन करता येणार नाही पण या मध्ये भाजप केंद्र व राज्य स्तराची ताकद लावून इतर उमेदवारांनी केलेल्या सर्व बेरजेची वजाबाकी करून आपले मताधिक्य विविध प्रकारे वाढवण्याची शक्यता असते. त्या पॅटर्न मध्ये किरण ठाकरे यांचे व्यक्तिमत्व साजेशे आहे.
भाजपने उमेदवारी कायम ठेवल्यास विविध नेते हे या मतदारसंघात येऊन सत्याचे राजकीय प्रयोग करू शकतात याची जिल्ह्यातील इतर दोन आमदारांना कल्पना आहे. त्यामुळे कर्जतला बालदी पॅटर्न राबवल्यास तीनही मतब्बर उमेदवार यांच्या अडचणीत भर पडू शकते. माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचा पाठिंबा व शहरी व ग्रामीण मतदारांची चॉईस बदलण्यासाठी भाजपा मेहनत घेऊ शकते.
परंतु हा पॅटर्न राबवण्यास राज्यात कुठे व किती बंडखोरी होते यावरून कर्जतचे गणीत लागण्याची शक्यता आहे.
#bjp #karjat #Bjpkarjat #shivsenq #ncp