कर्जत मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीत बंडखोरी केली आहे. भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल. केला.
भाजपचे प्रस्थापित नेते माजी आमदार थोरवे यांना आश्वस्त करत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जर बंडखोरी झाली तर कारवाई होणार. 500 च्या वर लोक किरण ठाकरे सोबत जाणार नाहीत परंतु ठाकरे यांना हजारो तळागाळातील कार्यकर्त्यांचे समर्थन मिळाले. ठाकरे यांनी एकही रुपया मोबदला न घेता भाजपा कार्यकर्त्यांना कंत्राट मिळवून दिली असल्याने व गोरगरीब कार्यकर्त्याच्या मागे ते उभे राहत असल्याने जिल्हा पदाधिकारी यांना न जुमानता भाजप कार्यकर्ते ठाकरे यांच्या सोबत गेले.
ठाकरे यांच्या समर्थनार्थ भाजपचा फक्त एक गट उतरला व खालापूर तालुक्यातून विशेष कोणी आले नसताना 5000 हुन अधिक संख्या जमली. अजून भाजपा मध्ये दोन ते तीन विविध गट कार्यरत असून हे सर्व गट व माजी आमदार सुरेशभाऊ लाड हे किरण ठाकरे यांच्यासोबत आल्यास शिंदे गटाची डोकेदुखी वाढू शकते. यामुळे शिंदे गट संतप्त आहे.
शिंदे गटाचे आमदार बैठकीला येणार आहेत असे न सांगता सुरेशभाऊ लाड यांच्या कार्यालयात भाजपा नेत्यानी भाजपच्या पदाधिकारी यांची बैठक बोलावली. त्यास साधारण एकूण प्रमुख 300 पैकी 50 कार्यकर्ते उपस्थित राहिलें. आमदार यांची गाडी पाहून काही कार्यकर्ते खालूनच निघून गेले. त्यावेळी भाजपा नेते यांनी आमदार महोदय यांच्या समोर आजवर दिलेल्या वागणुकीचा संताप व्यक्त करून जर दिलगिरी व्यक्त केली तरच कार्यकर्ते काम करतील अन्यथा आम्ही किरण ठाकरे यांची बंडखोरी व त्याना समर्थन देणाऱ्या लोकांना रोखू शकणार नाही. असे जाहीर केल्याने आमदार संतप्त झाल्याचे वृत्त आहे.
भाजपा हा एकमेव पक्ष महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अविभक्त राहिलेला पक्ष आहे. कर्जत विधानसभेत असणारे भाजपा कार्यकर्ते पक्षाचा आदेश मानणारे आहेत उलट कर्जत विधानसभेत शिवसेनेचे उभे दोन भाग पडले आहेत. त्यातले 60% नेते जरी थोरवे यांच्यासोबत गेले असले तरी जुन्या शिवसेनेला मतदारांची साथ आहे. थोरवे यांची मदार विकत घेतलेल्या मतदारावर आहे. त्यात भाजपाला माननारा वर्ग थोरवे यांच्यापासून दगावल्यास त्याचा मोठा फटका थोरवेना बसु शकतो याचा अंदाज आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
भाजपाने महेश बालदी पॅटर्न राबवल्यास थोरवे यांचा कोअर समजला जाणारा हिंदुत्ववादी मतदार व भाजपा समर्थक मतदार हा भाजप बंडखोर व्यक्तीस गेल्यास कमावलेले राजकीय वैभव जाण्याची भीती निर्माण झाल्याने शिंदे गटात चिंतेचे वातावरण आहे. शिंदे गटात दामत येथील गोमास विक्री करायला निघालेल्या कसायाचे प्रवेश झाल्याने भाजपा कार्यकर्ते चिडले होते. तसेच मागे थोरवे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याची भाषा केली होती. याचाही राग भाजपच्या स्थानिक लोकांच्या मनात आहे.
तरीही थोरवे यांना भाजपचे ठराविक नेते आपल्या सोबत राहतील अशी आहे. त्यासाठी काही लोकांना निवडणूक होण्या आधी कॉन्ट्रॅक्ट तर काहींना नगरअध्यक्ष पद आधीच जाहीर करण्यात आले आहे. काहीना सरपंच तर काहींना जाहिरातीचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. पण या नेत्यांनी खूप प्रयत्न, दुरध्वनी व वैयक्तिक जाऊन मनधरणी करून भाजपचे कार्यकर्ते किरण ठाकरे यांच्या पाठीशी गेल्याने भाजप नेत्याचा फोटो वापरून युतीला मानणाऱ्या मतदाराला आकृष्ट करण्याचा उपक्रम थोरवे समर्थकानी उचलला असल्याचे दिसून येते.

