
कर्जत नगरपरिषदेला सेटल करून अनधिकृत बांधकामाला अभय देणे इतके सोपे झाले आहे की आता ही बाब महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कमानीचे अप्रत्यक्ष विद्रुपीकरण करेपर्यंत पोचलेली आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा गाजावाजा करून श्री सदस्य आहोत असं जाहीर सांगणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुमारे 5 कोटी हुन अधिक रक्कम खर्च करून कर्जत मुरबाड नाशिक नॅशनल हायवे वर मोठाली कमान उभारली व त्याला महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांचे नावं दिले. यामुळे काही प्रमाणात कर्जतच्या चेहऱ्यात बदल नक्कीच पडला व राजकारण ही झाले पण आता या सुशोभीकरणाला हरताळ फासायचा उद्योग हा स्वतः मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे स्थानिक नगरसेवक यांना हाताशी धरून करत असल्याचा कयास आहे. व याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खाते झोपलेले दिसून येते.
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे सुशोभीत केलेल्या कमानीशेजारी एक पक्के विटेचे बांधकाम सर्व्हिस रोड च्या प्रस्तावित जागेत सुरु असून याबाबत एका व्हाट्स अप ग्रुप वर चर्चा झाल्यावर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने मुख्याधिकारी यांच्याशी बोलूनच आपण हे बांधकाम करत आहोत अशी कबुली दिलेली आहे. तसच या व्यक्ती सातत्याने उपनगरअध्यक्ष यांच्या केबिन मध्ये घिरट्या का घालत होत्या? यामुळे संशयास वाव आहे. याबाबत शिंदे गटाच्या लोकांनी बॅनर लावून यावर क न प मध्ये असलेल्या विरोधी पक्षाने सुद्धा मौन का धरले आहे?
कर्जत नगरपरिषद इथे उबाठा व राष्ट्रवादी ची सत्ता आहे. या सत्तेच्या प्राप्तीसाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत केली त्यांनी सत्ताधारी वर्गाकडून अशा पद्धतीची अनधिकृत कामे करून घेण्याचा विडा उचलला आहे का? व मुख्याधिकारी एका बांधकामावर कारवाई न करण्याचे किती घेतात? असा सवाल जनतेतून उपस्थित होतो आहे
याचं कमानी शेजारी सिमेंट रस्ता फोडून आमदार थोरवे यांना शुभेच्छा देणारा बॅनर लागला असून त्यावर देखील मुख्याधिकारी हे कारवाई करण्याची शक्यता नाही त्यामुळे ज्या शहरातील अधिकारी, पुढारी व राजकीय कार्यकर्ते यांना जर एखाद्या महान व्यक्तीच्या नावाने उभी राहिलेली कमान अशी अनधिकृत कामानी व फलकांनी वेढा देऊन हफ्तेबाजी करायची आहे त्यांनी इतका निधीच कशाला खर्च केला? फक्त कॉन्ट्रॅक्ट साठी का? असा गंभीर प्रश्न इथे उपस्थित होतो.
आता या अनधिकृत वंधकाम जागेवर होणारे व्यवसाय व वाहनांची पार्किंग या कमानीच्या शोभेत वाढ करणार आहेत का? व या बांधकामाला अजून नोटीस देऊन हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यावर मुख्याधिकारी यांनी कारवाई का केली नाही? त्याबाबत एका मोठ्या वृतपत्र यांनी बातमी देऊन राज्याच्या नगरविकास खात्याने अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल का घेतली नाही? असा सवाल उपस्थित होतो. याचा अर्थ मुख्याधिकारी यांना या सर्व व्यवस्थेच अभय असून त्यांना मिळालेल्या मोबदल्याशिवाय या बाबीवर दुर्लक्ष शक्य नाही. अशा अनेक तक्रारी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे पेंडिंग असून फक्त नोटीस देण्या पलीकडे काहीही झालेलं नसल्याने या बाबीची चौकशी ही विभागीय आयुक्त यांनी करावी व सरकार ने एसीबिला ही बाब फॉरवर्ड करावी अशी आमची मागणी आहे.
सर्वात संतापजनक बाब ही स्थानिक नगरसेवक यांची आहे. नगर अध्यक्ष तुमच्या दारीं या संकल्पनेत व नफा फंड खर्च करण्यात कर्जत नगरपरिषद गुंतलेली असताना अनधिकृत बांधकामाला पेड संरक्षण देण्याचा हा घोटाळा समोर आलेला आहे. यामुळे कर्जत पनवेलच्या नवीन स्टेशन समोर होणाऱ्या रहदारीस अडथळा निर्माण होणार आहे
एखाद्या नगरसेवकाच्या वॉर्ड मध्ये अनधिकृत बांधकाम झाल्यास तो नगरपरिषद अधिनियम याच्यानुसार अपात्र होतो व मुख्याधिकारी यांनी अनधिकृत बांधकाम यावर कारवाई न केल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा नोंदवता येतो याचा नगरसेवक व मुख्याधिकारी यांना विसर पडलेला आहे.
कर्जत नगरपरिषद यांनी अशा अनेक वांधकाम यावर या आधी देखील कारवाई करण्याचे टाळलेले आहे. यावरून यामध्ये किती पाणी मुरले आहे? काय भावात तोड झाली आहे हा संशोधनाचा भाग आहे. उबाठा व राष्ट्रवादी यांची नगरपरिषद मध्ये असलेली सत्ता यांना ही शिंदे गटाच्या आमदारांनी बांधकाम केलेली कमान सलते आहे का? हा ही सवाल आहे. की यांना महापुरुषांच्या कमानीच्या अशोभीकरण/ अवमानाची काहीच पडलेली नाही?
या कमानीशेजारी असणाऱ्या पक्क्या बांधकामावर कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी कारवाई न केल्यास या बांधकामास सर्वपक्षीय राजकीय संरक्षण आहे व ही कमान हा महापुरुषांचा सन्मान करण्यासाठी नाही तर फक्त राजकारण करण्यासाठी आहे असा कयास आम्ही काढून यावर कारवाई न होईपर्यंत हे सत्र चालवू. व पुढील बातमी ही कमान उदघाट्न करणाऱ्या लोकांचे प्रेम बेगडी असून हे फक्त राजकारण आहे असा निष्कर्ष काढण्याचे लेखन स्वातंत्र्य दाखवून द्यावे लागेल.
ही बातमी सर्वानी शेअर करून हे देवाण घेवाण करून संरक्षण केलेले अनधिकृत बांधकाम व पोस्टर वर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावे असे याद्वारे आव्हान आहे.
#illegalconstructuion #nanasahebdharmafhikari #eknathshinde #Maharashtra #DevendraFadanvis #karjat #karjatrailwaystation
