काही दिवसापूर्वी खोपोली येथील माजी नगरसेवक अश्विनीताई पाटील व भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी मधील आधारस्तंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मर्जितले मानले जाणारे राहुल जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थिती मध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे उत्तर रायगड भाजपच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसून येते.
अश्विनी पाटील व राहुल जाधव यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मर्जित राहून विविध पद मिळवली होती व नवीन कार्यकारणी मधील भाजपा मध्ये परत स्थान मिळवत परत पनवेल फेम भाजपचा झेंडा कायम पुढे नेण्यास मदत केली पण तरीही त्यांना पक्षत्याग का करावा लागला? यावर आचार्य मराठीने शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.
कर्जत विधानसभा क्षेत्रात आमदार महेंद्र थोरवे हे भाजपचा भक्कम पाठिंबा घेऊन निवडून आले आहेत. त्यासाठी त्यांना माजी आमदार सुरेशभाऊ लाड व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेकांनी मदत केली. अनेक कार्यकर्त्यांना याकामासाठी जंपल गेलं. पण आता येणाऱ्या निवडणुकीत न. प मध्ये सत्ता येणार आणि ही सत्ता आल्यावर पद कोणाला देणार याची चर्चा जबाबदार नेत्यांनी करून चण्या फुटाण्याप्रमाणे आधीच उमेदवार व पद जाहीर केल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस ने घेतलेला दिसून येतो. यामुळे नगरसेवक फुटले आहेत.

भाजपा पक्ष फुटीनंतर उत्तर रायगडच्या काही पदाधिकारी यांनी टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली पण नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून परत सारवासारव केली असल्याची बातमी कर्जत मध्ये पसरली आहे.
थोरवे यांच्या विजयात सुरेशभाऊ लाड यांनी विविध खेळी खेळल्या व मतदारांना चकवा देऊन थोरवेना निवडून आणल्याची चर्चा असल्याने जनमत विरोधी असताना देखील आमदार थोरवे हे निवडून आले आहेत. एकूण मतदानापैकी 61% हुन अधिक मतदाराने थोरवे विरोधी मतदान केले आहे. त्यावेळी भाजपकडून बटेंगे तो कटेगे हा मुद्दा पुढे आल्याचा फायदा खोपोली शहरात थोरवे यांना झाला.
आता सुधाकर घारे यांनी दुरावलेला मतदार व त्यासाठी नेते जमवायला सुरवात केली असून थोरवे यांची कार्यपद्धती हे भाजप नगरसेवक फुटीचे कारण दिसून आलेले आहे तर हे डॅमेज कंट्रोल करायला फोन करण्यापलीकडं उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या नेत्यांनी काहीच प्रयत्न केलेले दिसून येतं नाहीत.
कर्जत मतदारसंघात भाजपा वाढू नये यासाठी उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी अनेक वर्ष आकार्यक्षम होती हे विधानसभा काळात किरण ठाकरे यांनी केलेल्या टिकेवरून दिसून आलेले आहे. त्यामुले त्याचा फायदा थोरवे व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. थोरवे यांनी पनवेल व उरण मध्ये लक्ष द्यायचं नाही व पनवेल उरण चे आमदार कर्जत मध्ये पक्ष वाढीस अथवा रोजगार निर्मितीत विशेष लक्ष देत आहेत असे अजिबात दिसलेले नाही. उलट महेश बालदी हे भाजपचे आमदार आहेत की नाही? असा प्रश्न भाजपचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते विचारत असतात.
भाजप चे प्रदेश अध्यक्ष आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कर्जत भाजपच्या नेत्यांना काम दिली नसती तर ग्रामीण भागातील संघटना ही वाऱ्यावर सुटली असती व त्याचा फायदा दोन पक्षांनी उचलला असता हे आमचे नशीब असं भाजपा कार्यकर्ते बोलून दाखवतात.
थोरवे आमदार असताना कर्जत शहरातील व ग्रामीण भागातील व कर्जत, खोपोली शहरातील कार्यकर्त्यांना विशेष काम देण्यात आलेली नाहीत. कर्जत नगरपरिषद मध्ये सत्ता असताना विकासकामातील वाटा भाजपा कार्यकर्त्यांना मिळालेला नाही उलट भाजपा सोबत युती असताना थोरवे यांनी भाजपचे कार्यकर्ते स्वतःच्या पक्षात घेतले आहेत. थोरवे यांचे भाजपा नेत्यांशी सख्य असल्याने व उत्तर रायगड भाजपचे आधारस्तंभ या जिल्ह्यात विशेष लक्ष देत नसल्याने थोरवे यांना भाजपसोबत काहीही करण्याची मुभा मिळते. पण भाजपात त्यांचा तीन आमदारांच्या तडजोडीत विकास होत नाही म्हणूनच खोपोली येथील नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे.
भाजपचे काही नगरसेवक थोरवे यांचे फोटो बॅनर वर लावत आहेत

तर काही नगरसेवक व पदाधिकारी हे व्यावसायिक संबंध जोपासत आहेत. त्यांनी काही जमिनी शिंदे गटाच्या लोकांसोबत पार्टनरशिप मध्ये घेतल्याची कर्जत मध्ये चर्चा आहे. यामुळे कर्जत व खोपोली भाजपचे रोजगार न मिळवता नुसते हिंदुत्व जिंदाबाद करणारे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. व याची दखल पक्षाचे वरिष्ठ घ्यायला तयार नाहीत. काही वर्षांपूर्वी पक्ष कार्यकर्ता भैलू पटेल यांनी आम्हाला नगरपरिषद मध्ये विकासकामे मिळाली नाहीत अशी तक्रार करून देखील पक्ष नेतृत्वाने काही दखल घेतली नव्हती. त्यामुळे आंघोळीत राहून आपण कोरडे अशी भावना भाजपा कार्यकर्त्यात असल्याने निवडणुकीच्या तोंडावर आरोग्य खात्याचे घोटाळे बाहेर येऊ शकतात.
भाजपा कडून अजून कुठलीही युतीची अधिकृत घोषणा प्रदेश स्तरावरून झालेली नसताना भाजपच्या नेत्यांनी थोरवे यांच्यासोबत उघड सख्य ठेवल्याचा फटका हा भाजपला बसण्याची शक्यता अधिक आहे. माजी आमदार सुरेसभाऊ लाड यांची एकेकाळी कर्जत खोपोली येथे सत्ता असताना नगरसेवक कोण होणार अथवा नगर अध्यक्ष कोण होणार हे जाहीर नव्हते. आता हे शिंदे गटाकडून जाहीर झाले आहे असा आरोप नाराज कार्यकर्ते करत आहेत.
निवडणूक तोंडावर जर असे भेद होऊन राज्यात महायुती कायम राहून ती कर्जत मतदारसंघात तुटली व थोरवे यांच्यासोबत भाजप गेली तर थोरवे यांच्यावर नाराज असलेले भाजपा कार्यकर्ते ग्रामीण भागात असेच बंड करतील याची दखल उत्तर रायगड भाजपा ने न घेतल्याने लॉबीगच्या राजकारणाला कंटाळून पनवेल महानगर हा वेगळा जिल्हा करावा अशी मागणी भाजपात जोर धरू लागली आहे. व भाजपचे वरिष्ठ यावर काही करताना दिसण्याची शक्यता कमी असल्याने पक्ष वाढू न देण्याचा काही गोचीड विचारसरणीच्या नेत्याचा मनसुबा यशस्वी होत आहे.
एका बाजूला शेकडो कोट्यावधी रुपयांचे टेंडर भाजपा मध्ये आलेल्या शेठ लोकांना मिळत असताना आम्ही किती काळ स्वतःच्याच कार्यकर्त्याचा विकास करणाऱ्या लोकांच्या पालख्या वाहणार? हा सवाल भाजपा मध्ये उपस्थित होत असून निवडणुकी अगोदर थोरवे विरोधी कल आल्याने भाजपात त्याचे मंथन झाल्याचे कुठूनच दिसून आलेले नाही.
