भाजप कार्यकर्ते व भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच पनवेल मधील भिंगार या गावचे स्वखर्चाने निवडून आलेले विद्यमान उपसरपंच श्री अशोक गायकर यांना पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय जिल्हा कार्यकारणीच्या सांगण्यावरून स्थानिक मंडल अध्यक्ष यांनी घेऊन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय घटनेला आव्हान देण्यात आलेले आहे. अशी चर्चा गायकर यांच्या समर्थकांत व भाजपमध्ये आहे.
श्री अशोक गायकर हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांच्याकडे भारतीय गोवंशाच्या शेकडो गायी आहेत. तसंच त्यांनी मत्स्यपालनात वन देवता या कृषी पर्यटन केंद्राच्या द्वारे नांवलौकीकं प्राप्त केला आहे. गायकर यांची दुग्धव्यवसायिक व भाजप कार्यकर्ते म्हणून चांगली ओळख निर्माण केली आहे व श्री गायकर हे स्थानिकं भाजप पेक्षा प्रदेश भाजपशी जास्त संलग्न आहेत.
श्री अशोक गायकर यांनी स्थानिक गुरचरण जमीन हडप करणाऱ्या एका विकासका विरुद्ध महसूल मंत्र्यांकडे ग्रामपंचायतिद्वारे वकिलाकडून अपील दाखल करून दाद मागितली होती. ही केस मागे घेण्यासाठी माझ्यावर काही व्यक्ती दबाव टाकत होते व आपल्याला शेकाप सदस्यांच्या फायद्यासाठी उपसरपंच पदाचा राजीनामा द्यायला दबाव आणत होते आपण या दबावाला बळी न पडल्याने आकसाने ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे श्री गायकर यांनी सांगितले आहे. ज्या विकासकाविरुद्ध मीं गावाच्या हितासाठी लढतो आहे त्या ठिकाणी बड्या नेत्यांच्या मामाच्या नावे कोट्यावधी चे कंत्राट असून शेतकरी व शासनाच्या मुळावर उठणाऱ्या विकासकासाठी पक्षाचा असा गैरवापर होणे हे दुर्दैव सल्याचे गायकर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान प्रदेश कार्यकारणी सदस्याला मंडल अध्यक्षाला पक्षातून सहा वर्ष काढायला लावण्यामागे जिल्हाअध्यक्ष यांच्या तोंडी सुचना आहेत अशी प्रतिक्रिया मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील याने दिली आहे. श्री पाटील यांना आपण प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या काही सूचना होत्या का? याबाबत विचारणा केली असता त्यांना विचारायची गरज या विषयात नाही जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ऑफिसला या असे त्यांनी आचार्य मराठीस सांगितले आहे.
वास्तविकता भारतीय जनता पक्षाची घटना पाहता एखाद्या व्यक्तीचे निलंबन करण्याचा अधिकार हा प्रदेश अध्यक्ष यांचा असून त्यासाठी पक्षाच्या वतीने श्री गायकर यांना प्रदेश स्तरावरून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली नाही अथवा माझे कायदेशीर रित्या काय चुकले? याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. असे गायकर यांनी म्हंटले असून याबाबत प्रदेश अध्यक्ष, मुख्यमंत्री व केंद्रीय अध्यक्ष यांच्यासह प्रधानमंत्री मोदी यांना पत्र पाठवणार असल्याचे गायकर यांनी सांगितले आहे. तसेच वेळ पडल्यास आपण मानहानीचा दावा आवश्यक व्यक्तीवर देखील दाखल करू असे श्री गायकर यांनी म्हंटले आहे. अशा पद्धतीचा दावा दाखल झाल्यास त्यासाठी प्रदेश भाजपच्या व्यक्तींना घटनेतील तरतुदीसहं साक्ष द्यायला लागू शकते असे कायदेशीर जाणकार यांचे म्हणणे आहे.
भारतात सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध भारतीय जनता पक्ष हा खटला फेमस असून सुब्रमण्यम स्वामींनी भाजपच्या कार्यकारणीस कोर्टात जेरीस आणले होते व त्यांचे निलंबन कोर्टाने बेकायदेशीर ठरवल्याचा खटला सर्वश्रुत आहे.
स्थानिक मंडल अध्यक्ष यांनी अथवा जिल्हा अध्यक्ष यांनी या संदर्भात प्रदेश अध्यक्ष यांना न विचारताच भाजपला आव्हान कोणाच्या सांगण्यावरून दिले आहे? यामागे कोणाचा बालहट्ट आहे? या गोष्टीची भाजप मध्ये चर्चा आहे. यामागे साधा उपसरपंच मोठ्या लोकांना नडल्याने या गोष्टीचा आदर्श पनवेल मधील इतरही ग्रामपंचायती घेऊन बिल्डर व भांडवलशाहीच्या नाकात दम आणू शकतात यामुळे अशोक गायकर यांच्यावर कारवाई झाली नाही ना? हा सवाल उपस्थित होतो आहे.
श्री गायकर यांच्यावर ते किसान मोर्चा मध्ये पदाधिकारी असताना आमदार तथा तत्कालीन जिल्हा अध्यक्ष यांनी अशोक गायकर यांना रायगड जिल्ह्यात पक्षाचे कामं करण्यात मनाई करावी अशा पद्धतीची मागणी केली होती परंतु त्यावर प्रोव्हीजन नसल्याने कोणत्याही पद्धतीत कारवाई झाली नाही. उलट श्री ठाकूर जिल्हा अध्यक्ष असलेल्या रायगड जिल्ह्यात भाजपने जिल्ह्याचे विभाजन करून रायगड उत्तर व रायगड दक्षिण असे जिल्हे तयार केले. आता ठाकूर हे जिल्हा अध्यक्ष नाहीत पण ठाकूर यांचे काँग्रेस पक्षात असताना स्वीय सहाय्यक राहिलेला व्यक्ती जिल्हा अध्यक्ष आहे हे ही महत्वाचे आहे.
भाजप मध्ये श्री ठाकूर यांनी लीना गरड या नगरसेवक असणाऱ्या महिलेचे घरपट्टी विषयावर पक्षाला विश्वासात न घेता आंदोलन केल्याने निलंबन केल्याचा आरोप सरश्रुत आहे. तसेच बाविस्कर नावाच्या नगरसेवकास देखील पक्षाद्वारे कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली होती. लीना गरड ही ठाकूर यांच्या विरुद्धच दुसऱ्या पक्षात जाऊन उभी राहिली.
श्री गायकर यांच्यावरील कारवाई रोखली न गेल्यास राज्यात विविध ठिकाणी असणारे मंडल अध्यक्ष पनवेल विधानसभेप्रमाणे आपले बालहट्ट पुरवण्यास व समाजवादी विचारांची भाजप मध्ये मनमानी करण्याच्या उद्देशाने हव्या त्या व्यक्तीला काढून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयाचा ताप वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या विषयात श्री रवींद्र चव्हाण याबाबत काय निर्णय घेणार? भाजपची मातृसंस्था असणारा संघ परिवार या समाजवादी व तुघलकी पद्धतीकडे कसे बघणार हा कुतूहलाचा विषय असणार आहे.
. आचार्य मराठी वृत्त
संपर्क 9673894005