रवींद्र चव्हाण यांचा भाजप वाढीचा संकल्प. अनेकांना धडकी भरवणारा.

भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून राज्यभरात माजी आमदार, माजी मंत्री, माजी खासदार, नगरअध्यक्ष, नगरसेवक, जी. प सदस्य यांच्यासह विविध पक्षातील तळागाळात काम करणाऱ्या लोकांचे पक्षप्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे यामुळे राज्यभरात उबाठा, शप राष्ट्रवादी व काँगेसला धक्के बसत आहेत.

रवींद्र चव्हाण हे भाजप मधले लो प्रोफाइल राहून मीडिया च्या दृष्टीने एका कोपऱ्यात काम करणारे नेते गणले जात होते. ज्यांचा उबाठा सरकार पाडण्यात मोठा रोल होता. रवींद्र चव्हाण यांच्यामुळे शिंदे हे राज्यातील प्रमुख नेते म्हणून पुढे आले असं म्हणल तर अतिशयोक्ती ठरणार नाही. यामागची कारणं ही तशीच आहेत.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली नामक शहरात पूर्वी सर्व राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे वर्चस्व होते. अशा ठिकाणी बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणून ज्या व्यक्तीने सामाजिक आयुष्याची सुरवात केली तो आज देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष बनेल अशी कोणी कल्पना देखील नव्हती केली.

रवींद्र चव्हाण भाजप प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक दिवशी विविध पक्षाचे हजारो कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश करत असून महाराष्ट्र भाजप आता चव्हाण यांच्या नेतृत्वात स्थानिकं स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या दृष्टीने बेरजेचं गणित करत आहे.

रवींद्र चव्हाण हे भाजप प्रदेश अध्यक्ष होण्या आधी त्यांच्या राजकीय बहूआयामी कार्यावर नजर टाकणे गरजेचे आहे. श्री चव्हाण हे संघ विचारसरणी बाळगणारे असल्याने व त्यातल्या त्यात भाजपचे सिनियर आमदार असल्याने सन 2014 ते 2019 या काळात फक्त 2 वर्षाकरता राज्यमंत्री पदी निवडले गेले. त्यावेळी पक्षाचे महामंत्री पद पाहत त्यांनी कोकण प्रदेशातल्या भाजप कडे लक्ष घातले.

याच वेळात चव्हाण यांच्याकडे भाजपकडून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील आले. यावेळी भाजप कडे जिल्ह्यात फक्त एक आमदार प्रशांत ठाकूर हे होते. श्री चव्हाण यांनी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या निवडणुकीत भाजपचे तीन तर शिवसेनेचे तीन आमदार निवडून आणले. या सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्या नेतृत्वात भाजपने अशक्यप्राय कामगिरी केल्या.

गुजरात बॉर्डर ते गोवा बॉर्डर या 750 किमी लांब अशा कठीण भागात ज्या ठिकाणी रेल्वे आणि गाडी शिवाय वाहतुकीची सोय नाही अशा ठिकाणी चव्हाण हे पहाटेपासून ते रात्रीपर्यंत पक्ष संघटना वाढीसाठी प्रवास करत.

सन 2014 ते 2019 नंतरच्या काळात रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांचा भाजप प्रवेश सुकर केला तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत राणे यांना जुळवून घ्यायला भाग पाडले. नवी मुंबईत चव्हाण यांनी हजारो मंदा म्हात्रे व नाईक वाद असताना त्यावर यशस्वी शिष्टाई केली. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पालघर जिल्ह्यात भाजपने भरारी घेतली. 2019 नंतरच्या कार्यकाळात जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा देखील रवींद्र चव्हाण यांनी कोकणात उबाठा यांचे आमदार सांभाळले आणि आता तेच आमदार शिंदे गटात सामील झाले यामागे रवींद्र चव्हाण यांचे मोठे योगदान आहे व हे आमदार पाहिजे तेव्हा आपल्यासोबत बंड करतील याची शिंदे ना देखील भीती आहे.

रवींद्र चव्हाण यांना फक्त कोकण प्रदेशातून 5000+ sms येतात आणि त्यातले बहुतांशी मेसेज ते वाचतात. रात्री अपरात्री कार्यकर्त्यांचे फोन घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं सातत्यपूर्ण काम रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. एकाच दिवसात पालघर ठाणे याभागात पोचत त्यांनी संध्याकाळी सिंधुदुर्ग ते रात्री रत्नागिरी अशा बैठका कोकणाचे नेतृत्व करताना घेतल्याने त्यांचे पक्षांतर्गत व युतीतले विरोधक ही चाट पडले आहेत. सर्व स्तरातील गोरगरीब कार्यकर्त्याच्या घरी जाऊन साधं भोजन घेणं आणि पक्ष वाढीसाठी लोकल ट्रेन पासून ते रेल्वेने अथवा गाडीने सतत प्रवास करणं ही रवींद्र चव्हाण यांची वैशिष्ट्य आहेत. गोवा महामार्ग पाहणीसाठी चव्हाण आपला दौरा रात्री 1 वाजता चालू करत तो संध्याकाळी संपत असे. या गोष्टीची दखल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे.

रवींद्र चव्हाण भाजप प्रदेश अध्यक्ष होण्या अगोदर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते व आधीच्या टर्म मध्ये ते भविष्यात प्रदेश अध्यक्ष होणार असे केंद्रीय नेतृत्वाने संकेत दिले असल्याने त्यांनी राज्यातल्या प्रत्येक आमदाराशी संपर्क वाढवून आपले पक्षीय पंख पसरले. यातूनच आता पक्ष प्रवेशाची रेलचेल दिसते आहे. यामध्ये शिवसेना उभाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी यासहं मनसे व शेकाप चे मतब्बर नेते सोबत आले आहेत.

रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नेतृत्वाचं अनोख प्रदर्शन करत विविध महापालिका, पदवीधर व शिक्षकं पदवीधर यासह नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोकण क्षेत्राची जबाबदारी घेऊन विक्रमी यश संपादन केले आहे. वेळ प्रसंगी भाजपच्या कार्यकर्त्याला नमते घ्यायला लावून इतर पक्षांना सोबत घेऊन त्यांनी संघटन टिकवले ज्यात कार्यकर्ते नाराज होण्याचं प्रमाण फार कमी आहे.

रवींद्र चव्हाण यांनी पक्ष प्रवेशाचा सपाटा लावून शत प्रतिशत भाजपच्या दृष्टीने एक पाऊल पुढे नेले असून चव्हाण यांचे पक्ष प्रवेश हे त्यांच्या सर्व स्पर्धकाना धडकी भरवणारे असे आहेत. या त्यांच्या महत्वकाक्षेला जर राज्य शासनातील सत्ताधारी व्यक्तींनी व केंद्रीय भाजपने बळ दिल्यास अनेक पक्षांचे नाममात्र दुकान उघडे राहण्याची शक्यता आहे त्यातला माल सर्व रवींद्र चव्हाण भाजपसोबत नेतील असे राज्यात चित्र आहे. चव्हाण यांचा कोकणातील कामगिरीचा आलेख याचा फायदा निश्चितच भाजपला राज्यात फायद्याचा ठरू शकतो

भाजप प्रदेश अध्यक्ष होण्याच्या ते मंत्रिपद जाण्याच्या कार्यकाळात रवींद्र चव्हाण यांना कार्यकारी अध्यक्ष पद देऊन केंद्रीय भाजपने अनेक डावपेच आखले आहेत व रवींद्र चव्हाण यांनी संयमाने अनेक अडचणीचा सामना करत एका मोठ्या पक्षाचे राज्याचे नेतृत्व हातात घेत मोठ्या लढाईची तयारी केल्याचे दिसून येते. राज्यात मराठा मोर्चाचे सावट येणाऱ्या स्थानिक निवडणुकीवर असून आता रवींद्र चव्हाण हे मराठा प्रदेश अध्यक्ष यावर कसा मार्ग काढतात हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

हृषीकेश जोशी.

Scroll to Top