कर्जत मध्ये 29 तारखेला माजी आमदार महेंद्र थोरवे यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षाच्या वतीने भरण्यात आला. यासाठी भाजपा कडून सुरेशभाऊ लाड हे व्यासपीठावर येणार अशी घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष भोईर यांनी केली होती तसेच भाऊ आमच्या सोबत फॉर्म भरायला आले होते असा दावा शिंदे गटाचे कार्यकर्ते करत होते हा प्रकार खोडसाळ आहे असे श्री राजेश लाड यांनी म्हंटले आहे.

श्री राजेश लाड यांनी दिलेल्या माहिती नुसार सुरेशभाऊ लाड हे भाजपा कार्यकर्ते राहुल आंबवणे यांच्या घरी त्यांच्या दिवंगत आईचे उत्तरकार्य असल्याने धीर द्यायला उपस्थित होते. त्यांच्यासाठी कार्यकर्ता हा फॉर्म भरण्याच्या सोहळ्यापेक्षा महत्वाचा असल्याने त्यांनी तिथे उपस्थित राहणे पसंत केले असे राजेश लाड यांनी म्हणलें आहे.
श्री सुरेशभाऊ लाड यांच्या कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनंती केले नुसार ग्रामीण भागातील कार्यकर्ते युतीचा फॉर्म भरायला येणार असल्याने भाजपचे राजेश भगत व इतर सहकारी यांनी थांबण्याची व्यवस्था केली होती. काही काळ सुरेशभाऊ लाड आपले कार्यालयात उपस्थित राहिले व नंतर वेणगाव येथे निघून गेले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी सुरेशभाऊ लाड यांची त्यांचे कार्यालयात जाऊन भाजपा कार्यकर्ते व लाड समर्थक यांनी समर्थन द्यावे अशा पद्धतीचा मानधरणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील वृत्त आहे. त्यावेळी त्या ठिकाणी दीपक बेहरे हे उपस्थित होते. श्री लाड यांनी मी आयुष्यभर आपल्या विरुद्ध संघर्ष केला व आपणही माझ्या विरुद्ध संघर्ष केला आहे. मी जर आज तुमच्यासोबत येण्याची जाहीर भूमिका आता घेतली तर माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते रुचेल की नाही याबाबत माझ्या मनात साशंकता असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळं लाड यांची युतीबाबत व थोरवे यांना समर्थन देण्याची भूमिका अद्याप स्पष्ट होत नाही. वास्तविकता दोन विचारधारा व वेगवेगळ्या वृतीची माणसे व्यवहारासाठी एकत्र येण्याचा राज्यात जमाना असताना श्री लाड यांनी घेतलेल्या तात्विक भूमिकेचे कर्जत च्या नागरिकात कौतुक होते आहे.

श्री सुरेश लाड हे युतीच्या कार्यक्रमाना हजर असतात पण ते कोणासोबत आहेत ही त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. ते युतीत आहेत असे ढोबळमानाने गृहीत धरले तरी ठाकरे गटाने व शिंदे गटाने ते आमच्यासोबत आहेत असा दावा केल्याने त्यांना व त्यांच्या सर्व समर्थकांना या विषयाचा मानसिक त्रास होतो आहे. असे श्री राजेश लाड यांनी म्हंटले आहे. लवकरच भाऊंची भूमिका आपल्याला समजेल असे श्री राजेश लाड म्हणाले.
सुरेशभाऊ लाड यांच्या मदत मिळावी यासाठी श्री सुधाकर घारे, श्री नितीन सावंत व श्री किरण ठाकरे यांनी कंबर कसलेली आहे. श्री सुरेशभाऊ लाड हे माझे आदर्श असून मी त्यांच्या राजकीय जीवनाचा आदर्श घेतला असून ते भगवान श्रीकृष्ण रूपात असून मी त्यांचा अर्जुन आहे असं श्री महेंद्र थोरवे यांचं लाड यांच्या कार्यालयातील भाजप बैठकीतले भाषण निष्फळ ठरण्याची शक्यता जास्त वाटत आहे.
श्री राजेश लाड यांनी दिलेल्या उघड स्पष्टीकरणामुळे शिंदे गटाने भाजपच्या बंडखोरीचा धसका घेतल्याचे दिसून येते. श्री लाड यांच्या कार्यालयात युतीचा फॉर्म भरायला विशेष कार्यकर्ते आले नाहीत. श्री किरण ठाकरे यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते गेल्याने सेनापती एकीकडे व सेना दुसरीकडे अशी अवस्था झाली होती. यामुळे शिंदे गटात निराशा आहे.