नुकतेच 29 तारखेला महेंद्र थोरवे यांचे फॉर्म भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन पार पडले. यासाठी रायगड व ठाणे जिल्ह्यातून विविध ठिकाणचे लोक ट्रेन, बसेस नी कर्जतला आल्याची चर्चा आहे. तसेच थोरवे यांचा फॉर्म भरायला मावळचे खासदार श्रीरंग तथा आप्पा बारणे हे देखील उपस्थित होते. श्री बारणे यांनी शिंदे गटाचे खासदार या नात्याने थोरवे यांच्या रॅलीसं हजेरी लावली होती.

या रॅलीचे उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते व रॅलीत प्रत्येकाला विविध गमजे, टोप्या, झेंडे यांचे वाटप करण्यात येऊन कर्जतच्या सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा यशस्वी खेळ करण्यात आला.
या रॅलीत आप्पा बारणे लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर फिरत असल्याने कर्जतच्या नागरिकांना त्यांच्या मागील पाच वर्षातील संसदरत्न कामगिरीची आठवण झाली असावी. श्री बारणे यांना ससंदरत्न पुरस्कार मिळाला असला तरी कर्जतच्या मतदारांनी त्यांना 18 हजार मतांनी मागे टाकले होते.
ज्या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत त्याच मतदारसंघात बारणे 18 हजार मतांनी मागे पडलेले असताना वास्तविकता शिंदे गटाने ही युतीतली जागा राष्ट्रवादी अथवा भाजपला सोडणे गरजेचे होते. परंतु शिंदे गटाने असे न करता भाजपा आणि राष्ट्रवादीचा रोष ओढवून घेतला. पर्यायी दोन्ही पक्षाने इथून बंडखोरी केली.
श्री अप्पा बारणे यांच्यात व थोरवे यांच्यात विशेष सख्य नसल्याचे जनमानसात उघड बोलले जाते. त्यामुळेच अप्पा बारणे यांना लीड मिळवून देण्यासाठी थोरवे यांनी विशेष मेहनत घेतलेली दिसून आली नाही. उलट बूथ वर अप्पा बारणे यांच्या अपेक्षेनुसार व रसदीनुसार काम झाले नाही. अप्पा बारणे यांना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघात लीड मिळाला पण कर्जतला त्यांना फटका कोणामुळे बसला याचे संशोधन बारणे यांनी केले असावे.
श्री बारणे आणि थोरवे यांच्यात सख्य नसल्यानेच व थोरवे यांच्यावरील जनतेच्या रागाचा हा फटका बसला होता अशी चर्चा आहे पण इतरही कारणे असू शकतात. कोव्हीड काळात मध्य रेल्वे ने कर्जत स्थानकाचा अप व डाऊन मार्गाचा थांबा रद्द करून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या न थांबवण्याची व्यवस्था केली त्यासाठी रेल्वे कडून प्रॉफिट व तांत्रिक कारण देण्यात आलेले आहे . त्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना व विविध नागरिकांनी अप्पा बारणे यांच्या माध्यमातून निवेदन दिले पण श्री बारणे यांच्या प्रयत्नांना विशेष यश आलेले नाही. यावरून कर्जतचे बहुसंख्य नागरिक हे अप्पा बारणे यांच्यावर नाराज असल्याने त्याचा फटका थोरवे यांना या निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. या प्रश्नाची व्याप्ती इतकी मोठी आहे की कर्जत च्या दुर्गम भागातील व खोपोली येथील तसेच कर्जत ते अंबरनाथ भागातील नागरिकांना कल्याणला उतरावे लागते. कर्जतला अगदी नगण्य गाड्या थांबतात.

मागील लोकसभा निवडणुकीत श्री बारणे हे 18 हजार मतांनी मागे पडले त्यावेळी भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी दादा गट हे सोबत असताना ही परिस्थिती होती. यावेळी यातील 50% समर्थक हा थोरवे यांच्यापासून दुरावलेला दिसून येतो. परंतु 3 उमेदवार फॅक्टर वर थोरवे यांची मदार आहे. त्यातला कॉमन मॅन हा रेल्वे प्रवासी आहे. तो रेल्वेच्या प्रश्नावरून साहजिक नाराज आहे.
श्रीयुत अप्पा बारणे यांच्याकडे विविध निवेदन देऊन कर्जत ते अंबरनाथ व खोपोली, मोहपाडा, पनवेल, रसायनी व इतर आजूबाजूच्या भागातील नागरिकासाठी आवश्यक असा रेल्वेचा थांबा अप्पा बारणे यांनी चालू करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केला नाही का? असा प्रश्न राजकीय जाणकार यांना आहे. रेल्वेचे अधिकारी हे राज्यकर्त्या पेक्षा मोठे आहेत काय? रेल्वे ही जनतेसाठी आहे की प्रॉफिट साठी आहे? कोव्हीड पूर्वी हे सर्व गाड्याचे थांबे रेगुलर होते. कर्जत ते पुणे पॅसेजर सुरु होती. हे सर्व युतीच्या शासन काळा मध्ये बंद पडले आणि त्यासाठी जनतेसाठी अपार संघर्ष करण्याची गरज असताना अप्पा बारणे आक्रमक न होता गप्प बसण्यामागे राजकारण असू शकते.
श्री थोरवे यांनी देखील एक दोन गाड्या वगळता रेल्वेकडून पॅसेंजर व अप गाड्यांचा थांबा सुरु करणेबाबत विशेष प्रयत्न केले नाहीत. केले असले तर ते दिसलें नाहीत त्यामुळे नागरिक नाराज आहेत. रेल्वेचा प्रश्नात असणारा नागरिकांचा त्रास हा इतर विकासकामे केल्याने सुटणारा नाही. व आतां निवडणुकीत त्यावर आश्वासन देऊन उपयोगही नाही. जनता आता प्रॅक्टिकल झाली आहे.
अप्पा बारणे यांनी प्रयत्न करून देखील कर्जतला पूर्वीच्या गाड्या परत थांबत नाहीत याचा अर्थ यामागे रेल्वेचे तांत्रिक मुद्दे व स्थानिम राजकारण असावे. कोव्हीड पूर्वीचे हे थांबे परत सुरु केले नाहीत तर हा दोष खासदार यांना द्यावा लागेल. त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत असेच म्हणावे लागेल. नागरिकांना याबाबत कोर्टात जाऊन तारिख पे तारीख सुरु आहे असे म्हणण्यात व लढून निराश होण्यात काही अर्थ वाटत नसावा. सबब नागरिकानी या गोष्टीचा राग थोरवे यांना मतदान न करता काढला तर हे प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे असेच म्हंटले जाईल. असाच राग नागरिकांनी मागील वेळी मशालीला मतदान करून काढला होता.
थोरवे यांनी अप्पा बारणे यांच्या जास्तीत जास्त सभा आयोजित केल्यास नागरिक हा विषय आठवून अन्य उमेदवाराना मतदान करायला जाऊ शकतात व थोरवे यांना याचा फटका बसू शकतो.