अजिंक्य असूनही नम्र देवेंद्र फडणवीस.

पाच वर्षांपूर्वी ज्या माणसाची पहाटेचा शपथविधी फेल करवून उबाठा आणि श. प यांनी यथेच्छ खिल्ली उडवली होती. अडीच वर्षाने सरकार पडल्यावर उपमुख्यमंत्री करण्यात आले म्हणून ज्याची चेष्टा झाली त्या माणसाने आज एका निवडणुकीत अनेक शत्रू गारद केले. पण नम्रपणा किंचित कमी झाला नाही.

त्याच्या विरुद्ध जातीयवाद केला. हा व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं नेरेटिव्ह सेट करण्यात आलं आज तोच व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदाच्या उंचीच्या वर पोचला आहे. नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आहे.

भारतीय जनता पक्षाने देवेंद्र जी च्या नेतृत्वात 128 आमदार 2014 ला जिंकले. पण बहुमत नसल्याने शिवसेना सोबत घ्यावी लागली व राज्य कारभार केला . नंतर झालेल्या निवडणुकीत युतीत 105 लोक निवडून येऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून व शरद पवार यांच्याकडून दुहेरी फसवणूकीचे राजकारण झाले. नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला.

105 आमदारांचा प्रमुख व्यक्ती विरोधी पक्षनेता झाला. अविरत संघर्ष करून त्याने दोन मंत्री जेल मध्ये पाठवले. असा जहाल विरोधी पक्षनेता राज्याने पहिला नव्हता. त्या ही काळात पेन ड्राइव्ह प्रकरण काढून त्यांना अटक करण्याचा मविआ चा डाव आयशस्वी करून दाखवला.

अडीच वर्षाने शिवसेना फुटली. नंतर जे सत्तातरण झाले. त्यात उपमुख्यमंत्री पद मिळाले व ते स्वीकारावे लागले. शिंदे संघटने सोबत कार्यकर्त्यांचे खटके उडत असताना युतीत राष्ट्रवादी पक्ष फुटून सहभागी झाला. या अभूतपूर्व सरमिसळ सरकारबाबत विविध मत प्रदर्शन झाले आणि लोकसभेला मोठी निराशा आली. त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

दिसत नसला तरी युतीत असून देवेंद्र फडवणीस यांना शिंदे यांच्या संघटनेचा मोठा अडसर गेल्या अडीच वर्षात झाला होता. योग्य वेळेची वाट भाजपा प्रणित संघटन पाहत राहिले. शिंदे यांच्या आमदारांच्या झालेल्या चुका पोटात घेत राहिले. त्यांच्या आमदारांच्यावर असलेल्या नाराजीचा भाजपावर अथवा युतीवर परिणाम होऊ दिला नाही याचेही श्रेय फडणवीस यांना जाते. यात सखोल कारणे देता येत नाहीत कारण अनेकांना ती माहिती आहेत.

देवेंद्र फडणवीस लोकांना सांगत राहिले की फक्त 2% मतदान मविआ ला जास्त आहे आपल्याला थोडी मेहनत करावी लागेल कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून जातं असताना या माणसाने व राष्ट्रीय विचाराच्या संघटनानी डाव्या मराठी मिडीयाचा पूर्ण प्रोग्राम फेल करून टाकला.

राष्ट्रीय विचारांच्या संघटना विना मोबदला निस्पृहपणे काम करत उतरल्या व मतदानाचा वाढलेला टक्का युतीच्या पारड्यात पडला. त्यात प्रचंड निगेटिव्ह वातावरण असणारे अथवा निष्क्रिय उमेदवार देखील मोठया फरकाने निवडून आले आहेत हे सर्व श्रेय या राष्ट्रीय विचारांच्या संघटनाचे आहे. हे श्रेय देवेंद्रजींनी स्वतःला न घेता या संघटनाना दिले.

आजचे भाजपचे राजकीय यश पाहता. अपक्ष भाजपला सोबत मिळाले आहेत. शिंदेना 10 दिलेत. अजित पवार यांना 8 दिलेत. त्यात बहुमत 75% पेक्षा जास्त आहे. इतका मोठा सपोर्ट कोणाला आहे? जरागे फॅक्टर चालवणारे मागचे सूत्रधार न बोलता या माणसाने झोपवले. काहीही न बोलून 🌷 फुलवले. अर्थात या सर्वासोबत केंद्र भाजपची रणनीती आहे.

विजयाचा उन्माद वा अहंकाराचा लवलेश नसलेला हा माणूस अनेकांची दुषणे घेऊन राज्याच्या अशा पदावर जाऊन बसला की त्याची कल्पना कोणी केली नसावी. गेल्या अडीच वर्षात राज्यातला कमकुवत असलेला विरोधी पक्ष दिग्गज नेत्यांच्या पराभवासह रसातळाला नेला.

नाव देवेंद्र फडणवीस आहे व त्यांची नम्रता, सहनशक्ती व चातूर्य याची देशभर चर्चा आहे.

ऍड. हृषीकेश जोशी.

Scroll to Top