दिशा सालियन केस निमित्ताने

सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असणाऱ्या दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी सीबीआय ने करावी अशी तीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात मागणी केलेली आहे.

यात महत्वाचे हे आहे की यात आदित्य ठाकरे यांना व मुंबईच्या माजी महापौराना नाव घेऊन लक्ष करण्यात आले आहे म्हणून दिवंगत दिशाच्या वडिलावर टिकेची झोड उठत आहे.

यात तीन यंत्रणानी तपास केले आहेत व काही प्राप्त झालेले नाही असा निष्कर्ष अनेकांनी काढला असून सरकार या सर्वांमागे असून आदित्य ठाकरेंना सरकार घाबरलं आहे असा बेसलेस आरोप केला जातं आहे.

देशात असे कोणते उदा. आहे ज्यात खून व बलात्कार विषयात एखाद्या राज्यकर्त्या व पक्षप्रमुख व्यक्तीच्या मुलाला सजा झालेली आहे? त्याच न्यायाने आदित्य ठाकरे मोकळे आहेत का हे आता कोर्टाने बघायला हवं.

राजकीय नेत्यांची, भाई लोकांची आणि सरकारी अधिकारी यांची एकमेकांत एक फंडामेंटल समजूत असते की ते कधीच विशिष्ट मर्यादे पलीकडे एकमेकांना त्रास देत नाहीत. कारण सर्वांचे आभाळ फाटके असते.

आदित्य ठाकरे यांच्याबाबत जेव्हा राज्यात रान पेटलेलं होत तेव्हा अनेक ठिकाणी ही चर्चा झाली की ते मोदींना जाऊन भेटले व आता त्याचा उल्लेख श्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केला आहे.

जेव्हा हे प्रकरण ऐन रंगात आले तेव्हा आदित्य ठाकरेंचे वडील मुख्यमंत्री होते. पोलीस यंत्रणा सरकारचा पैसा वसुल करण्यात व्यस्त होती. सचिन वाझे सारखे अधिकारी यांनी पापांची सरबत्ती केली होती त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे कसायाकडून तपास करण्याचा प्रकार होता. त्यावेळी हे प्रकरण दाबले गेल्याचा लोकांना संशय आहे.

सी बी आय ला तपास करण्याची राज्यात परवानगी काढण्यात आली होती. महाविकास आघाडी राज्यात जुलमी शासन राबवत होते अशात दिशा व सुशांत यांना न्याय कोण देणार होते? दिशाचा बाप संपूर्णतः सिस्टीमचा बळी पडला. त्या व्यक्तीला सर्व राजकीय नेत्यांनी वाऱ्यावर सोडले. असच आजवरच चित्र आहे कारण तेच की राजकीय समजूती. सुप्रिया सुळे बरोबर बोलल्या होत्या की अकेला फडणवीस क्या करेगा? निदान या बाबत तरी सतेच्या चाव्या शेवटच्या अडीच वर्षात ताब्यात नसणारे फडणवीस हतबल होते.

आदित्य ठाकरे यांच्या बाजूने आज बोलणारे पत्रकार महाविकास आघाडीचा जुलमी कारभार विसरले आहेत का? तथ्य नसलेले अन्वय नाईक प्रकरण काढून या विषयी बोलणाऱ्या अर्णव गोस्वामीला अटक केली. सरकार विरोधात बोलली म्हणून कंगनाचे घर तोडले. केतकी चितळे व निखिल भामरे सारख्या नवोदित तरुणांना सोडले नाही. सचिन वाझे सारखे अधिकारी माजले. यावेळी आज आदित्य ठाकरे यांच्या बाजूने बोलणारे पत्रकार कुठे होते?

विषय सरळ आहे. दिशाच्या वडिलांना सरकारने न्याय दिला नाही. यंत्रणा विकल्या जातात देशात आजवर हेच होत आलेले आहे. याबाबत माध्यम काही करू शकत नाहीत व सरकार देखील बुजरेपणा दाखवू शकते कारण त्यात मविआ सारखी सूड बुद्धी नाही. तस असत तर जितेंद्र आव्हाड हा त्याच्या स्वीय सुरक्षा रक्षक मृत्यू प्रकरणी चौकशीत अडकला असता. 12 आमदारांना बेकायदेशीर निलबीत करणारा भास्कर जाधव परत आमदार नसता झाला. असो, तर पत्रकारांनी वास्तवात आदित्य ठाकरेला पाठीशी घालणाऱ्या भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारला वेठीस धरायला हवं होत. पण त्यांनी इतरांप्रमाणे त्याला बाय देऊन टाकली.

संजय राऊतवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला कोणत्या राजकीय व्यक्तीने मदत केली होती? कारण ही लक्ष न देण्याची अलिखित समजूत. अशी अनेक उदा. देता येतील ज्यात राजकीय लोक एकमेकांना सांभाळतात व सर्वसामान्य व्यक्तीचा बळी दिला जातो.

आता आदित्य ठाकरे वर कारवाई होईल का? यावर कोर्ट काय म्हणते त्यावर गेम आहे. कारण आपल्याकडे विरोधी पक्ष सुप्रीम कोर्टाला नाव ठेवतो. पत्रकार व सोशल मीडिया वर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून काढून शरद पवार यांच्या मुलीला हयातीत मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न भंग झाल्यापासून कोर्टाला नाव ठेवण्याची पद्धत आलेली आहे.

निखील वागळे वगैरे लोकांनी या कोर्टाच्या केसला आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध षडयंत्र म्हंटले आहे. व आदित्य ठाकरे यांनी अग्नी परीक्षा द्यावी असं वागळे म्हणतात.

आदित्य ठाकरे एक जेन्यून नेते आहेत व त्यांनी वागले यांचे आव्हान स्वीकारून नार्को टेस्ट देण्याची तयारी केली तरच भाजप यात राजकारण करत आहे असं म्हणता येईल.

जे जे पत्रकार व ठाकरे समर्थक मृत दिशा सालियनच्या वडिलांना नावं ठेवत आहेत भाजपचे हे राजकारण म्हणत आहेत त्यांनी यामधल्या सहभागी सरकारी अधिकारी व आदित्य ठाकरे यांना नार्को टेस्ट ची गळ घालावी. हा विषय खालच्या खाली बंद झाला व निर्णग काही आला तरी सरकार व कोर्ट बदनाम होणार आहे. त्यामुळे आपण स्वतःच पुढे यायला नको का? व हे उदा. जगाला देखील द्यावं.

दिशा सालियन प्रकरणी मागील पाच वर्षात असलेले सरकार दोषी असल्याने नवीन सरकार कडून आशा आहे. यावर लेखन बरंच करता येईल. पण तूर्तास ठाकरे निर्दोष असले तर त्यांची टेस्ट आधीच फेल गेल्याचा रिपोर्ट आणला गेला असता. नार्को टेस्ट ही आजच्या काळातील अग्नी परीक्षा आहे त्याला ठाकरे मान्यता देणार आहेत का व त्यांना हा प्रश्न न विचारता निर्लज्ज लोक मृत दिशा सालियन च्या वडिलांना दोषी धरणार आहेत.

हृषीकेश जोशी.

कर्जत रायगड.

#adityathackeray #bjpgovernment #dishalian #shivsena #lawandorder #bombayhighcourt #sushantsinghrajput #news

Scroll to Top