सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातली गोष्ट आहे तीन पक्ष एकत्र झाल्यावर युतीला विधानसभेला जे मतदान झालं आणि जनतेने जी महाविकास आघाडीला हिंदुत्वाच्या नावाने लाथ मारली त्यांची तूट भरायला पवार यांना ठाकरे, अबू आझमी व बच्चू कडू यांना एकत्र करावे लागेल. तेव्हा सर्वांची दुकानं सुरु राहतील.

यात गैर काहीच नाही. 2024 ला मोदींना हरवायला पवार यांनी देशातील एकमेकांचे थोबाड न बघणारे 1760 लोक एकत्र आणले होते. पण इथे फडणवीस यांनी लावलेल्या स्ट्रॅटेजी मध्ये पवार राज्यात अडकून राहिले. आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर त्यात कोणतेही राज्य हीत नाही तर बिएमसी आणि राज्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे बेरजेचे गणित आहे. मीडिया मध्ये सध्या या विषयाची जोरदार चर्चा आहे व अचानक आदित्य ठाकरे यांच्या दिशा सालियन केस ची चर्चा बंद झाली आहे.
2024 ला राज ठाकरे यांनी मनसेकडून मोदींना बिनशर्थ पाठिंबा दिला होता व साक्षात प्रधानमंत्री यांनी येऊन त्यांच्यासोबत भाषण केले. त्या मोबदल्यात राज यांना काय मिळाले होते? ते सांगता येणार नाही पण त्यांचे कार्यकर्ते उपाशी राहिले.

राजा जगला तर प्रजा जगते हे पश्चात्य विद्वान मॅकेवेली चे तत्व आहे पण इथे त्या तत्वाचा अतिरेक झाला आहे. दोन्ही ठाकरे यांच्या पक्षात मानवी श्रमांचे अवमूल्यन झाले आहे. सन 2005 पासून अनेकदा सेना मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. जर ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले तर ते मविआ व युतीचे नुकसान करतील. पण ते मविआ सोबत राहिले तर जनता ते स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. याची कारणे आहेत
उद्धव ठाकरे हे माजी हिंदुत्ववादी आहेत तर राज ठाकरे यांनी भाजप सोबत भविष्यात युती होईल या आशेवर हिंदुत्ववादी मार्ग धरला आहे. उद्धव ठाकरे यांना मुस्लिम कॅडर मिळाले आहे तर राज ठाकरे यांचा मुस्लिम मतदार लांब गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस च्या व्होट बँकेला हात घातला आहे तर राज यांनी स्वतःकडचे मतदार भाजपकडे जाऊ दिले पण भाजपचा मतदार त्यांच्याकडे गेला नाही. या दोघांचे मतदार परस्पर विरोधी आहेत. त्यांच्याकडे कॅडर आहे पण मतदान हे 12% पेक्षा अधिक नाही. या उलट भाजपकडे 26% मतदान आहे. सबब ठाकरे एकत्र येणे म्हणजे तेल आणि पाणी एकत्र येणे.
विधानसभेला शरद पवार यांच्या पक्षाचे पार पानिपत झाले आहे. काँग्रेस उरली आहे आणि ती मविआ मध्ये दादागिरी करते. काँग्रेसला 12% मतदान मिळाले शिंदेना 12.38 % तर अजित पवार यांना 9.4 टक्के मतदान झाले आहे. यात राज ठाकरे यांचं 2% मतदान नाही पण ते 2019 च्या लोकसभेसारखा बूस्टर डोस देऊ शकतात. उद्धव ठाकरे पक्षाचे 10% मतदान देखील नाही असे असताना राज सोबत आले. तर गणित किती मोठे होईल?
संघटनेला एखाद्या कॅडर च्या माध्यमातून जाती समुहाच्या माध्यमातून मिळणारे मतदान वगळता युवा पिढी आणि महिला वर्गाचे मतदान एकत्र करण्यासाठी राज यांची गरज उद्धव ठाकरे व मविआ ला आहे. पण त्यात त्यांचे उरलेले कॅडर दोलायमान स्थितीत येईल.
राज हे एक्स्ट्रीमीस्ट आहेत त्यांनी मशिदीच्या भोंग्यावरून व उत्तर भारतीय मुद्द्यावर स्वतःची राजकीय भूमिका बदलली तरी त्यांना ही लोक मतदान करणार नाहीत. मराठी भाषेला आतां अभिजात दर्जा मिळाला असून बँकेत मराठी, रिक्षावाल्याची मराठी आणि शाळेतली हिंदी सक्ती यापुढे राजकीय मुद्दे नाहीत.
सबब या दोन ठाकरे प्रा ली एकत्र महाराष्ट्र राज्य व मराठी माणसाचे हीत यापेक्षा निवडणुकीचे बीजगणित होऊ शकते. फरक कधी पडेल जर युती मधला एखादा पक्ष फुटून यांना मिळाला पण ते ही सध्या शक्य नाही. सुरु दुकानातून कोणी बंद दुकानात जाणार नाही.
राज हिंदुत्ववादी झाले पण त्यांना भाजपने सोबत नाही घेतले कारण उत्तर भारतीय मतदार अजून भाजपसोबत आहे. भाजपने विकासकामे करून अनेक वर्गातील लोक सोबत घेतले आहेत. त्यामुळे भाजपची बेरीज स्वबळ आणि अजित यांचे भुज’बळ यांच्यावर भागू शकते. शिंदे देखील सोबत राहिले तर त्यांना राजकीय लाभच लाभ आहे.
राज उद्धव एकत्र येणे हा भाजपच्या नेत्यांच्या शिंदे विरोधी नितीचा भाग असेल अशी चर्चा जरी होऊ लागली तर सोशल मीडियावर विधानसभे नंतर वेडे झालेले गुलाम शिव्या शाप देतील.
सबब आदित्य ठाकरे यांच्या दिशा सालियन प्रकरणाच्या चर्चेला बाजूला सारून व तो मुद्दा पुढे आला तरी मराठी कार्ड पुढे काढण्याच्या पलीकडे या एकत्रित येण्याने विशेष फरक पडेल असे सध्या तरी चित्र नाही. 1966 ला जेवढी मराठी मनसे भोळी होती तेवढी सध्या राहिली नाहीत.