
भारतीय जनता पक्षाच्या कर्जत मंडळाची बैठक मंडल अध्यक्ष राजेश लाड यानी निवडणुकीमध्ये झालेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी व नवनिर्वाचित नगरसेवक रामदास गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये पक्षाचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी यानी आपले मनोगत व्यक्त केले. भाजपचे किशोर वैद्य, समीर सोहनी, राजेश लाड, हृषीकेश जोशी, रमेश मुंडे, समीर सोहनी, जहिर शेख, वसंतराव भोईर, सुनील गोगटे, डॉ. स्वाती लाड, दिनेश भरकले, नितिन परमार, स्नेहा गोगटे, स्वामींनी मांजरे यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यामध्ये प्रभाग क्रमांक 6 राष्ट्रवादी व उबाठा प्रबल प्रभाग असून आम्ही आहे त्या परिस्थिती मध्ये लढण्याचा प्रयत्न केला असं व संघटनेतल्या कमतरता व पक्षांतर्गत गटबाजीमुळे पराभव झाला. प्रचारासाठी 9 दिवस देण्यात आले व त्यात असणाऱ्या अपुऱ्या नियोजनामुळे पराभव झाला असल्याचे हृषीकेश जोशी यानी म्हंटले. एकूण 3000 मतदारापैकी फक्त 1500 मतदारापर्यंत मीं व्यक्तिगत पोचलो होतो त्यामुळे विजयाची अपेक्षा धरणे गैर आहे असं जोशी यानी म्हंटले. तसंच शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी अपक्ष फॉर्म भरून वेळ घालवला व मतदान मागताना व प्रचाराचे पाकीट देताना शिंदे गटाचे काही कार्यकर्ते फक्त धनुष्यबाणाचे मतदान मागून थेट उमेदवार यांचे मतदान मागत नसल्याचे रिपोर्टीग करण्यात आले. तसच काही व्यापारी पदाधिकारी यानी बूथ वर बसून आपल्याच रसदीने दुसऱ्या उमेदवाराचे काम केलं आहे असा आरोप जोशी यांच्या वतीने पुरावे देऊन करण्यात आला त्याला शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी दुजोरा देऊन निषेध केला. या प्रसंगी गद्दारांचे निलंबन करायचे की नाही? या राजेश लाड यानी विचारलेल्या प्रश्नावर सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून दुजोरा दिला आहे.
प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपचे कामं करणारा व fraud केस मध्ये जेल मध्ये राहून आलेला आरोपी राष्ट्रवादीच उघड काम करताना व भाजप उमेदवार विरुद्ध एका व्यापारी समाजात अफ़वा व गैरसमज पसरवत असताना दिसून आला आहे असा आरोप झाला. एखादा समाजाला सन 1992 पासून उमेदवारी सतत ही कार्यकर्ता म्हणून देण्यात आली होती ती समाज म्हणून दिलेली नव्हती. परंतु भाजपचे जातीला व समाजाला महत्व देण्याचे समरसतेचे तत्व न स्वीकारता काही लोकांनी फक्त पैसे कमवायला पक्षाचा वापर केला आहे. इतर सर्वांची मत घेता येतात. पक्षाच्या जोरावर पद घेता येतात पण पक्षाला देताना आपली झोळी फाटकी का? याचा विचार न झाल्यास भविष्यात सामाजिक कलह माजू शकतो. उमेदवारी नाही दिली म्हणून नवीन कार्यकर्त्याला व पक्षाला संपूर्ण शहरात जातीभेद करून का पाडले? व अशा अफ़वा पसरवणाऱ्या कार्यकर्त्यावर कारवाई तुम्ही काय करणार? असा सवाल आता नेतृत्वाकडे उपस्थित केला जात आहे.
शिंदे गट व भाजप यांच्या प्रभागातील सर्वाधिक मतांची बेरीज पाहता 850 च्या लीड नी थेट ची सीट लागणे अपेक्षित होते परंतु शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नियोजन स्वतःच्या हातात ठेवून पूर्ण पालिकेत फक्त धनुष्यबाण निशाणी सांगितली. भाजपच्या रसदेवर व मतावर स्वतःच्या सीट निवडून आणून भाजपच्या सीट पाडण्याचे काम केले असून भविष्यात शिंदे गटाशी युती केल्यास पूर्ण पक्ष साफ होईल अशा संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यानी पूर्ण कर्जत मध्ये लोकांनी कमळाला नाकारले आहे असा नेरेटिव्ह पूर्ण तालुक्यात करून त्यांच्या पत्रकार यानी तशा बातम्या छापल्याचा संताप व्यक्त केला.
कर्जत, खोपोली व माथेरान येथील बहुतांशी कार्यकर्त्यांचे म्हणणे हे शिंदे गटासोबत युती नको आहे असं असताना कार्यकर्ते राष्ट्रवादी सोबत चला असं म्हणत असताना ज्या नेत्यांनी आम्हाला शिंदे गटासोबत जोडले. त्यांच्या कार्यकर्त्यांना काहींनी काम तर व्याजी पैसे दिले. पाच वर्ष उपनगरअध्यक्ष पद असून व स्थानिक आमदार असताना कार्यकर्त्यांना कामं दिली नाही व पूर्ण संघटना शिंदे गटाला जोडुन पक्ष विकला गेला असा गंभीर सुर बैठकीत उमटला. आमदार थोरवे यांना राष्ट्रवादी शिवाय कोणी विरोधक तालुक्यात नको आहे व तो भाजप मधुन निर्माण होऊ नये. लाड त्यांच्या कंट्रोल मध्ये आले नसते त्यानी मतदार संघात नवीन नेतृत्व तयार केले असते व भाजपचा उमेदवार थोरवे यांच्या फेवरचा नाही ही थिएरी लक्षात घेऊन भाजपचा पराभव घडवून आणल्याची चर्चा कार्यकर्त्या मध्ये रंगली. त्यामुळे थोरवे समर्थक पगारी नेते यांच्या अडचणी उद्भवल्या आहेत.
भविष्यात तालुक्यात हजारो कोटीचे इन्फ्रा प्रोजेकट येतं असून भाजपला वाटा न देता तो वाटा फक्त खाजगी कंपनी व शिंदे गटाला मिळावा म्हणून हे षडयंत्र रचले गेले असा आरोप होतो आहे.
भाजप नेते रमेश मुंडे यानी मला पक्षाच्या नियोजन बैठकीला व तिकीट वाटपाच्या चर्चेत सहभागी केले नसल्याचे व पक्षातील कळीच्या नारदावर कारवाई न झाल्यास गंभीर परिणाम होतील असं म्हंटल. तर काही पक्ष प्रवेश करताना घरातील कार्यकर्त्याला न सांगणे इथपर्यंत गुप्तता पाळण्याची गरज नव्हती असं म्हंटले.
भाजप नेते किरण ठाकरे यानी कर्जत व खोपोली मधील अनेक नेते भाजप वाटेवर होते. त्यांना प्रवेश दिला असता तर आपण स्वबळावर लढलो असतो व अशा पद्धतीने नैराश्य आले नसते असं म्हंटल आहे. मागील वेळेस कर्जत मध्ये 4 नगरसेवक होते व खोपोली मध्ये थेट उमेदवार यांना 11 हजार मतदान झाले पण भाजपचा मतदार न ओळखता आपण युती आघाडीच्या निर्णयात का चुकलो याचे सर्वांनी आत्मपरीक्षण करून पक्षाचे अस्तित्व टिकवावे असं म्हंटल आहे. मीं एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून या पराभवाची जबाबदारी घेतो व मीं कुठे कमी पडलो असेन तर क्षमा करा असं म्हटले. भविष्यात ग्रामीण भागामध्ये आम्हाला कोनाशी युती आघाडी करायची यासाठी स्वातंत्र्य देण्यात यावे असं म्हंटल आहे. आपल्या पक्षात राहून कोणी नेते व पदाधिकारी इतर व्यक्ती व पक्षाच्या फायद्यासाठी भाजपची वाढ खुंटवत असतील तर ही पक्षासाठी धोक्याची घंटा आहे असं म्हंटल आहे. कर्जत नगरपरिषद मध्ये झालेल्या पराभवाने पक्ष सावध झाला असून उमेदवार यांच्या त्यागाचे फळ हे ग्रामीण भागाला मीळेल असं किरण ठाकरे यानी म्हंटल आहे.
अंबरनाथ मध्ये भाजप स्वतंत्र लढली तर बदलापूर मध्ये राष्ट्रवादी सोबत युती केली. कोकणात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी तर काही ठिकाणी स्वबळावर लढली असताना कर्जत भाजपचा शिंदे गटासोबत जाणे गरजेचे आहे असा चुकीचे रिपोर्ट देऊन बळी कोणी दिला? कोणी तिकीट वाटपात कमी जागा घेतल्या? राष्ट्रवादी सोबत युती का नाही केली? स्वबळावर का लढला नाहीत? व या पराभवास जबाबदार नेत्यावर कारवाई करणार की नाही? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यानी केला.
येणाऱ्या राज्यातील संपूर्ण निवडणुकीत शिंदे गटापासून भाजप नेते व कार्यकर्त्यांनी सावध पवित्रा घ्यावा राष्ट्रवादी सोबत जावे नाहीतर स्वबळावर लढावे असं कर्जत भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला लेखी कळवले असल्याचे वृत्त आहे.
