
सध्या विरोधी पक्ष फक्त अफ़वावर चालला असून त्यांच्याकडे दाखवायला ठोस कामं नाही. त्यामुळे फेक रील तयार करणे भाजप एम आय एम युतीबाबत खोटे लिहणे बोलणे या पलीकडे त्यांच्याकडे हत्यार नाही. अकोट न प मध्ये उभाठा, भाजप, अजित पवार गट, शिंदे गट व एम आय एम यांची आघाडी झाली. यात फक्त भाजप राज्यात टार्गेट झाली. तसंच अंबरनाथ ची काँग्रेस भाजप मध्ये विलीन होण्या आधी त्यांची सत्ता सोबत आली तिथे भाजप बदनाम झाली. बदनाम करणारे भाजपाई देखील होते.
अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये भाजप व शिंदे सेना यांचा रक्तरंजित संघर्ष होता. त्यामुळे तिथल्या स्थानिक नेत्यांनी अंबरनाथ मध्ये स्वतंत्र निवडणूक लढली तर बदलापूर मध्ये राष्ट्रवादी सोबत युती केली. दोन्ही ठिकाणी भाजपचे नगरअध्यक्ष झाले. अंबरनाथ च्या नगरसेवकांनी शिंदे संघटनेसोबत जायला नकार दिल्यावर विषय समिती पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक भाजपवासी झाले. ही निवडणुक शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे व भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यानी प्रतिष्टेची केली होती.
जे लोकं काँग्रेसला सोबत घेतल्यावर नाराज झाले आहेत त्यांना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना भाजप कार्यकर्त्यांनी जो इतके वर्ष संघर्ष केलेला आहे त्याची सूतराम कल्पना नाही. ते दुःख ठाणे व रायगड वासियांना अधिक आहे.
ज्या ज्या नगरपरिषद शिंदे गटासोबत युतीत लढल्या तिथे भाजपचा दारून पराभव झालेला असून स्वतंत्र अथवा इतर आघाड्या करून अथवा राष्ट्रवादी सोबत लढलेल्या नगरपरिषद मध्ये भाजपला फायदा झालेला आहे. कोकणातील झालेल्या न प मध्ये हे दिसून येते. भाजपचे मतदान हे शिंदे संघटनेला होते पण त्यांचे मतदान भाजपला होत नाही. एक तर कार्यकर्ते विरोधात जातील अथवा अपक्ष उमेदवार असतात अशी स्थिती दिसून येते. त्यामुळे स्थानिक पातळीवर एका निवडणुकीत फटका पडल्यावर स्थानिक नेते दुसरीकडे युत्या आघाड्या करतात.
ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजप संपवण्याचा प्रयत्न झालेला असल्याने महापालिका व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप पक्ष सावध झालेला आहे. हाच कार्यक्रम राष्ट्रवादी व शिंदे गटाने लोकसभेत पण केलेला होता. यावेळी त्यांच्या पक्षातील नेते देखील भाजपवासी होण्या अगोदर केंद्राकडून मनधरणी करण्यात आली. तेव्हा ठाणे व कल्याण डोंबिवलीला युती करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीत संघर्ष केलेला आहे. त्यांच्या वाट्याला काही विशेष आलेलं नसताना दुसऱ्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश निश्चितच स्पर्धात्मक असतात पण राष्ट्रकार्य म्हणून हे सहन करायला हवं. कारण पक्षातील नेत्यांना जास्त कळतं.
भाजप मध्ये येणारे काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा यामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज जरी होत असले तरी अनेक लोकं निस्पृहपणे पक्षाचं कामं करून जोडले जातात. त्यांच्याकडून चांगल ते आत्मसाद करून कार्यकर्त्यांनी पुढ जायला हवं.
शिवसेना उभाठा कार्यकर्त्यांनी देशद्रोह्यांना पक्षात घेतलं तरी ते चालतं. राष्ट्रवादी, उभाठा व काँग्रेस सत्तेत चालते. एकमेकांच्या जीवावर उठलेले दोन भावांचे कार्यकर्ते एकत्र येऊ शकतात पण काँग्रेस पक्षाचे लोकं भाजप मध्ये आल्यावर कोणाचं दुखत असेल तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. राजकारण हे बेरजेवर चालतं. तुमचा आवाका मोठा ठेवला तर धमाका मोठा होतो.
हृषीकेश जोशी.
कर्जत – रायगड.
