थोरवे यांचा मोर्चा आणि शिंदेना अंबरनाथ मध्ये फायदा? एकीकडे संघर्ष दुसरीकडे घर्षण.

कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आपल्या जवळच्या व महत्वाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्याबर आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. खालापूर येथील एकेकाळी भाजप कार्यकर्ते असणारे व आता शिवसैनिक म्हणून कार्यरत असणारे मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाल्यावर थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि जिह्वा अध्यक्ष सुधाकर यांच्यावर आरोप केले होते. मृत मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोली गाठली होती.

कर्जत विधानसभा मतदारसंघात युतीत वीळा भोपळ्याचे नाते तयार झालेले आहे. राष्ट्रवादीचे असणारे रवी देवकर व इतर यानी मंगेश काळोखे या शिवसेना नगरसेविकेच्या पतीची हत्या केल्यावर महाराष्ट्र राज्यातील वातावरण ढवळून निघाले. आमदार महेंद्र थोरवे व भरत गोगावले यानी आक्रमक होऊन पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. तसंच आमदार थोरवे यानी राष्ट्रवादीला टार्गेट करत राज्याचे लक्ष वेधण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आमदार थोरवे यानी सुधाकर घारे व भरत भगत यांच्यावर खुनाच्या कटाचे आरोप केले असून काळोखे हे थोरवे यांचे अत्यंत जवळचे व विविध गुण असलेले कार्यकर्ते होते त्यामुळे आमदार थोरवे डिस्टब असलेले दिसून आले.

आमदार थोरवे यानी रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांच्यावर व त्यांच्या कन्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यावर सातत्याबे टीका करून राज्यातले युतीचे सरकार अडचणीत आणले आहे. थोरवे हे सुधाकर घारे यांच्या अटकेची मागणी करत असताना खोपोली कर्जत पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकानी शिंदे गटाला व अडचणीत असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांना आणीबाणीच्या वेळी पाठिंबा दिलेला आहे. या घटनेमुळे दोन पक्षाची जवळीक वाढलेली असून आता सुधाकर घारे यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री कार्यालयातून अटकेचा दबाव येण्याची शक्यता किती आहे? असा सवाल जनतेतून उपस्थित होतो आहे.

अंबरनाथ मध्ये सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यानी एकनाथ शिंदे यांना तुल्यबळ आव्हान देत भाजपच्या नगर अध्यक्ष पदाला गवसणी घातली पण विषय समिती व उपनगरअध्यक्ष पदासाठीचे संख्याबळ त्यांच्याकडे नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घेऊन सत्तेकडे मुसंडी मारली. काँग्रेसच्या नगरसेवक यानी भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादी च्या चार नगरसेवक यानी भाजपला पाठिंबा दिला.

पण या सर्व संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना फक्त 4 जण असताना उपनगरअध्यक्ष पद मिळाले आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगरा अध्यक्ष यांचे अभिनंदन. असे बॅनर शिवसैनिक लावताना दिसून येत आहेत.

यासाठी शिंदे गटाने उदार होऊन हे पद बहाल केले असावे का? या मध्ये खोपोलीचा संघर्ष बाजूला नाही का पडला? की कार्यकर्ते एकमेकांशी रक्तरंजित संघर्ष करत असताना सत्तेसाठी शिंदे गटाने फक्त तडजोडी केल्या? याची उकल कर्जतच्या कार्यकर्त्यांना होणार नाहीच.

गेले अनेक दिवस खोपोली कर्जत मध्ये शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष सुरु असताना राष्ट्रवादी ने सत्तेसाठी शिंदे गटाशी घर्षण करून त्याला कर्जतच्या संघर्षाला मूठमाती दिल्याची नक्कीच किनार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ने एकाच वेळेला शिंदे गट आणि भाजपला नक्कीच झूरवत आपला राजकीय डाव साधल्याचे दिसून आले आहे व यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस यांस मुख्यमंत्री पदावर बसवून अजित पवार गायब झाल्याची घटना ताजी झाली आहे.

आमदार थोरवे यांच्या सांगण्यावरून शिंदे गटाचे तलागाळातील कार्यकर्ते पोलीस स्टेशनला कधी घेराव घालत आहेत तर कधी मेणबत्ती मोर्चे काढून वातावरण ढवळून काढत आहेत मात्र या सर्वांचा निकाल कारवाई मध्ये दिसण्याची चिन्हे कमी तर राजकीय तडजोडी मध्ये घेतला गेला का? याबाबत लवकरच जनतेला ज्ञान होईल.

आमदार थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. आता राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यावर थोरवे शिंदे यांच्यावर निशाणा कसा साधणार? हा सवाल त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला तरी त्याचे काही होणार नाही.

राष्ट्रवादी सोबत अंबरनाथ मधली लगट थोरवेना कशी चालते? यासाठी थोरवे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा निषेध करणार का? असा सवाल एकाही मीडिया मधील व्यक्तीने केला नाही आम्ही त्याला वाचा फोडली आहे . या पाठिंब्याच्या बदल्यात राष्ट्रवादी ने आपल्या पदरात काय काय पाडून घेतले आहे हे येणारा काल उत्तर देईल.

तूर्तास खोपोली व कर्जत येथे सुधाकर घारे यांच्यावीरुद्ध संघर्ष करणारे थोरवे व त्यांचे सैनिक आता शिंदे यानी केलेल्या अंबरनाथ मधील शिवसेना राष्ट्रवादी युतीकडे फक्त बघत बसणार आहेत. कार्यकर्ते संघर्ष करत असताना नेते सत्तेसाठी घर्षण करून तडजोडी करत आहेत का? असा संतप्त सवाल करण्याची व त्याचा निषेध करण्याची डेरिंग कोनात नाही.

Scroll to Top