किरण ठाकरेंच्या मदतीला धावले प्रदेश भाजपचे नेते. विद्यमान राजकीय नेत्यांची झाली अडचण?

कर्जत मध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने मोठे नाट्यमय वळण घेतलेले आहे. कर्जत मध्ये काही तासापूर्वी महायुतीची पत्रकार परिषद जरी झालेली असली तरी माणगाव जिल्हा परिषद गणात सर्वसाधारण महिला प्रवर्गात सौं. राधिका किशोर ठाकरे या भाजपच्या उमेदवार शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. याबाबत डिटेल प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

कर्जत भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख यांना कर्जत तालुक्यातील निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना प्रदेश भाजपने लक्ष घालून दिलेल्या होत्या. पनवेल महापालिका निवडणुकीत व्यस्त असलेल्या आमदार ठाकूर, आमदार बालदी व जिल्हा अध्यक्ष कोळी यांचे या निवडणुकीत कर्जत तालुक्यातील घडामोडी कडे लक्ष देणे शक्य नसल्याने किरण ठाकरे यानी त्यांची धुरा स्वतःकडे घेतली व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन विविध ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केली. ही तयारी अनेक व्यक्तीच्या डोळ्यात खुपत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे.मागील नगरपरिषद निवडणूक काळातील अनुभव पाहता प्रदेश भाजप नेत्यांनी या निवडणुकीत एबी फॉर्म देण्याची अधिकृत जबाबदारी ही खासदार धैर्यशील पाटील यांना दिलेली होती. श्री धैर्यशील पाटील यांना किरण यांच्याकडे कर्जतचे बी फॉर्म द्या अशा सूचना प्रदेश भाजपकडून असताना ते फॉर्म प्रोटोकॉल नुसार जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्याकडे गेले व ते किरण ठाकरेंना वेळेत न मिळाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

भाजप कार्यकर्ते व उमेदवार हे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना श्री कोळी शेवटच्या तासात फोन घेत नसल्याने कार्यकर्ते हवालदिल झाले. अशा वेळी किरण ठाकरेंना प्रदेश भाजप नेत्यांनी तारल्याचे वृत्त समोर आले आहे.

भाजपच्या जिल्हा कार्यकारणी ने स्थानिक शेकडो कार्यकर्त्यांना न विचारता तीन पंचायत समिती व एक जी प उमेदवारी अर्ज भरला होता व त्यात जाणीवपूर्वक साधारण बारा उमेदवार यांना फॉर्म भरण्यापासून रोखण्यात येणार होते. परिवर्तन विकास आघाडी अथवा शिवसेना आपल्याला जी प मध्ये सहभागी करून घेत नसेल तर आपण तालुक्यातील निवडणूक स्वतंत्र लढू हे कार्यकर्त्यांचे म्हणणे विचारात न घेता भाजपच्या जिल्हा अध्यक्ष व आमदारांनी परस्पर युती केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. आर्थिक देवाण घेवाण झाल्याशिवाय हे शक्य आहे का? असा सवाल कार्यकर्त्यांनी नेत्यांना विचारला. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमाटल्याने प्रदेश अध्यक्ष स्तरावर निर्णय घेऊन नविनं बी फॉर्म किरण ठाकरे यांना शेवटच्या 40 मिनिटात देण्यात आले. यामुळे अनेक नेत्याचा भ्रमनीरास झाल्याचे चित्र आहे. महायुतीची जरी घोषणा झालेली असली तरी किरण ठाकरेंनी युती व आघाडी यांचे गणित बिघडवले आहे. भाजपचे जिल्हा महामंत्री दपित बेहरे यानी भाजपला मतदान करा असं युतीच्या व्यासपीठावर सांगितले आहे.

यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली असून भाजपच्या नेत्यांनी परिवर्तन विकास आघाडीशी सुद्धा सांगड घातल्याची कुणकुण शिंदे गटाला लागली असावी. सुधाकर घारे यांचे भाऊ मधुकर घारे यानी त्यांच्या पत्नीचा फॉर्म भाजपच्या नावे भरला होता व तो किरण ठाकरेंच्या घरातील उमेदवाराच्या जागी भरल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. हे कोणी घडवले? याचा सवाल आता उपस्थित होतो आहे.

यामागे एक ठोस कारण दिसून आले की अशा पद्धतीने किरण ठाकरेंना रोखण्याचं कारण त्यांच्या मागील असलेली संघटना व त्यांनी घेतलेल्या सडेतोड भूमिका होत.

भाजपच्या पनवेल, उरण येथील आमदारांचे व कर्जतचे आमदार यांच्यात समजूत असून त्यांना भाजप युतीच्या कार्यकर्त्या पेक्षा पक्षाचे मतदान महत्वाचे आहे. यावर आम्ही कायम लिहलेले आहे.. या गोष्टी कार्यकर्त्यांना समजेपर्यंत उशीर झालेला असतो. किरण ठाकरेंनी व त्यांच्यासहं असणाऱ्या लोकांनी याबाबत कायम तक्रारी केलेल्या आहेत. तसंच किरण ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने या तीन आमदारासह सुधाकर घारे यांना स्पर्धा निर्माण झालेली होती. त्यामुळे किरण ठाकरेंना युतीत वा आघाडीत जाऊ न देण्यासाठी विविध नेत्यांनी प्रयत्न करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी त्यांची मदत केली आहे.

किरण ठाकरे यांनी कोणतेही पद नसताना गेल्या सात वर्षात तालुक्यात 150 कोटींची विकासकामे आणून व ती विना मोबदला कार्यकर्त्यांना देऊन वेगळा पायंडा पाडल्यानं व कार्यकर्त्यांची फळी निर्माण केल्याने राजकीय नेत्यांना वेगळे आव्हान निर्माण झाले तर पर्सेंटेज घेणाऱ्या नेत्यांची अडचण तयार झाली. यामुळे त्यांना रोखायला सर्वपक्षीय जोर दिसून येतो.

भाजप पक्ष उभा करायचा असेल. तर आपण कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन निवडणुक लढायला हवी असं ठाकरेंना वाटतं त्यामुळे त्यानी विविध जी प व पंचायत समिती अर्ज दाखल केले होते परंतु वरिष्ठ यांच्या आदेशानुसार ते मागे घेतले गेले आहेत. परंतु एबी फॉर्म गायब केल्याची दखल भाजपच्या नेतृत्वाने दुर्लक्ष करून कारवाई न केल्यास याचा फटका पक्षाला बसेल असं आमचं मत आहे.

माणगाव जिल्हा परिषद गणात किरण ठाकरेंकडे कोणतेही संविधानिक पद नसताना साडेनऊ कोटीची कामे केल्याचा त्यांचा दावा असून त्यानी विरोधकांना मोठे आव्हान दिले असून मातब्बर व्यक्तीच्या कारस्थानावर मात देत जनतेला साथ देण्याची साद घातली आहे.

Scroll to Top