कर्जत शिवसेनेला अतीआत्मविश्वास नडला! भाजपला रोखताना शिवसेनेने केला स्वतःचाच आत्मघात?

कर्जत मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाचा दारूण पराभव घडून आलेला आहे. कर्जत मध्ये भाजपचे अस्तित्व नाही व फक्त 20% मतदान हे भाजपचे माणगाव जिल्हा परिषद गणात असून आम्ही भाजपला ही सीट सोडू शकत नाही अशी भाषणबाजी आमदार थोरवे यानी केलेली होती. कारण त्यांना भाजप उमेदवार यांना रोखयचे होते परंतु परिवर्तन विकास आघाडीने यात आमदार थोरवेनाच रोखले आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपला कमी करण्याच्या नादात शिवसेनेचा घात करून गेली आहे.

आमदार महेंद्र थोरवे व आमदार प्रशांत ठाकूर समर्थक मोजकी भाजप यानी कर्जत मध्ये एका मोठ्या भाजप कार्यकर्त्यांच्या समूहाला विचारात न घेता परस्पर युती केली होती. या मोठ्या समूहाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात कशेळे, नेरळ, कळंब व माणगाव जिल्हा परिषद विभागात आहेत परंतू भाजपला जिल्हा परिषद मिळू नये यासाठी पनवेल भाजप ही प्रयत्नशील असल्याने कर्जत भाजप कार्यकर्ते हे संतप्त झाले. त्यानी वरिष्ठाकडे याचना करून सर्व जी प व पंचायत समिती फॉर्म भरले ते मागे घेण्यास लावून व कर्जतच्या भाजपला एकही जी प सीट न देण्याचा हट्ट करून शिवसेनेने स्वतःचा पूर्ण तालुक्यात आत्मघात करून घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर सखोल विश्लेषण करता येईल

नुकत्याच झालेल्या कर्जत खोपोली व माथेरान च्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार थोरवे यांनी सर्व पक्षीय यांच्यासमवेत भाजपला देखील लक्ष्य केले होते असा भाजप मधील मोठ्या वर्गाचा आरोप होता. अपक्ष उमदेवार अथवा विरोधी पक्षाचे काम शिवसेनेने केले यामुळे भाजप नगरसेवक पराभूत झाले असं कार्यकर्त्याचे म्हणणे असताना कार्यकर्त्यांना परत युतीत बांधण्याचे प्लॅनिंग यावेळी फसलेले दिसून आले.

भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात काम न करता आपला मोर्चा हा फक्त माणगाव जिल्हा परिषद गणाकडे वळवला व सर्व ठिकाणच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेत शिवसेनेला दारुण पराभव पाहावा लागला आहे. त्यामुळे कर्जत भाजपला रोखण्याचे दोन तीन आमदारांच्या प्लॅनिंग मध्ये शिवसेनेचाच आत्मघात झाला आहे.

भाजपने स्वबळावर लढलेल्या माणगाव जिल्हा परिषद गणात शिवसेनेच्या उमेदवाराचा फक्त 19 मतांनी पराभव झाला असून भाजप विरुद्ध महायुती असा अजब सामना इथे होता. भाजपचा पंचायत समिती उमेदवार हा स्वतःसोबत शिवसेनेचे मत मागत होता तर या उमेदवाराकडे जिल्हा परिषद मतदान मागायला भाजप कार्यकर्ते नव्हते. ते राधिका किशोर ठाकरे यांचे काम करत होते. नवख्या असलेल्या ठाकरेंना सुमारे 5078 मतदान झाले असून जर किरण ठाकरे यांचा अर्ज विधानसभा क्षेत्रात राहिला असता तर थोरवे निवडून आले असते का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर भाजप स्वबळावर एका ठिकाणीही ग्रामपंचायतीत सत्ता नसताना एका जिह्वा परिषदेत अर्ध्या कार्यकर्त्याच्या जोरावर 5078 मतदान घेऊ शकते तर विधानसभेला हा आकडा मेहनतीने कित्येक पटीने वाढू शकतो असा आत्मविश्वास आता कार्यकर्त्यामध्ये तयार झालेला आहे.

शिवसेनेने पंचायत समिती व जिह्वा परिषद निवडणुकीत भाजपच्या जिल्हा स्तरीय नेत्यापासुन अनेकांना महातुतीच्या प्रचारात उतरवले होते. माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचे समर्थक जोरात प्रचारात उतरले होते कारण लाड समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील यांना शिवसेनेने घरात उमेदवारी दिली होती. तीच सीट फक्त निवडून आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. लाड समर्थक उमेदवार हे जर थोरवेना विधानसभा काळात साथ देतील का? हा आता सवाल उपस्थित होतो आहे.

श्री नरेश पाटील यांचा सत्कार करताना सुरेशभाऊ लाड दिसत आहेत 👆

भाजप जिल्हा अध्यक्ष किरवली विभागात महायुतीचा प्रचार करताना भाजप उमेदवार यांच्यासोबत दिसत आहेत. 👆 वास्तविता मैत्रीपूर्वक लढतीत त्यानी भाजप उमेदवार ठाकरेंचाही प्रचार करायला हवा होता. परंतु कर्जतच्या आत्मघाती शिवसेना चॅप्टर चा अध्याय व कर्जत भाजपला रसातळाला नेण्याचा अध्याय पनवेल मधुन सुरु झालेला आहे त्यामागे डॅम च्या येणाऱ्या हजारो कोटींच्या कामाचे अर्थकारण आहे का? हा प्रश्न भाजप कार्यकर्ते विचारत आहेत. कारण शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष भाजप यानी स्वतः पंचायत समिती उमेदवार यांचा प्रचार करून मनसेचे काम केले असल्याचा आरोप होतो आहे. भाजप उमेदवार यांना निवडणुकीत तीन नंबर वर म्हणूनच स्थान मिळाले आहे.?

एकूणच भाजप कार्यकर्त्यांना नगरपरिषद निवडणुकीत पाडणे ते पडल्यावर भाजपला अती आत्मविश्वास नडला असं मीडियातून छापून आणणे व कमळ कर्जत मध्ये चालत नाही असा नरेंटिव्ह चालवणे. भाजप कार्यकर्त्यांना न विचारता अयोग्य ठिकाणी युती करणे व पनवेलच्या कमर्षीयल मंडळी सोबत भाजपचा घात करण्याच्या वाईट मनसुब्यांनी कर्जतच्या शिवसेनेने स्वतःचा आत्मघात करून घेतला आहे.

आमदार थोरवे यांच्या विरुद्ध सुमारे 60% मतदान पूर्ण तालुक्यात व विधानसभा क्षेत्रात होते. जर भाजप स्वबळावर लढले असते तर या मतदानाचा काही भाग हा विरोधकांकडे न जाता कर्जत भाजपकडे आला असता परंतु पनवेल च्या व्यावसायिक नेत्यांना कर्जतचा भाजप थोरवेना गहाण टाकायचा होता? त्यामुळे त्यानी भाजप च्या ग्रामीण भागातील उमेदवार यांना अर्ज माघारी घ्यायला लावले की आमदार थोरवे यानी ते मागे तगादा लावून घेतले? हा संशोधनाचा विषय आहे.

घडलेल्या प्रकारामुळे पनवेल भाजपच्या कंट्रोल मध्ये कर्जत भाजप नको अशी मागणी पुढे आली असून ती वरिष्ठपर्यंत गेली आहे. मधल्या मध्ये एक जिल्हा परिषद निवडून आल्यामुळे थोरवेना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी जिह्वा परिषदेत तटकरे सरस होतात की शिवसेनेची सत्ता येते हे पाहणे गरजेचे आहे.

भाजपचे उमेदवार पडल्यावर कमळ कर्जत मध्ये चालत नाही. भाजपला लोकांनी नाकारले. भाजपला आत्मविश्वास नडला वगैरे थिएरी छापून आणून भाजपचे कार्यकर्ते आपल्या पक्षात यावेत भाजपचा मतदार भाजप नेत्याकडं न जाता आमच्याकडं यावा हा शिवसेनेचा मनसुबा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यानी धुळीस मिळवला आहे व थोडक्यात नगरपरिषद पराभवाचे उट्टे जिल्हा परिषद निवडणूकित भाजपने काढले असून याचा फायदा परिवर्तन विकास आघाडीला झालेला दिसून येतो. परंतु आता परिवर्तन विकास आघाडीला भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे आव्हान असणार आहे. कर्जत भाजप दोन पक्षांना तिसरा पर्याय निर्माण करू शकतो.

कर्जत नगरपरिषद निवडणुकीनंतर भाजपला आत्मविश्वास नडला अशा प्रसिद्ध वृताची आठवण ठेवून आता धनुष्य कर्जत मध्ये चालत नाही. शिवसेनेला अती आत्मविश्वास नडला. पनवेल भाजपला हाताशी धरून कर्जतच्या शिवसेनेनें काही व्यक्तींना रोखाताना स्वतःचा आत्मघात कसा करून घेतला आहे ही बाब आम्ही जनतेसमोर आणून देतो आहोत.

Scroll to Top